अमरावतीच्या अवकाशातून गेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:09 PM2019-06-26T13:09:27+5:302019-06-26T13:12:32+5:30

मंगळवारी पहाटेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे अमरावती शहरावरून झालेले मार्गक्रमण पाहून अमरावतीकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

International Space Station from Amravati Space | अमरावतीच्या अवकाशातून गेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

अमरावतीच्या अवकाशातून गेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

googlenewsNext
ठळक मुद्देपहाटेचे विलोभनीय दृश्य मराठी विज्ञान परिषदेच्या माहितीवरून हजारोंनी केले निरीक्षण

वैभव बाबरेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मंगळवारी पहाटेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे अमरावती शहरावरून झालेले मार्गक्रमण पाहून अमरावतीकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अनेक खगोलीय अभ्यासकांसह जिज्ञासूंनी पहाटे ४.३३ ते ४.४८ या वेळेत अवकाश स्थानकाच्या मार्गक्रमणाचा अनुभव घेतल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
मराठी विज्ञान परिषदेचे खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे, प्रवीण गुल्हाने, सुशीलदत्त बागडे, रोहित कोठाळे व रवि कलाने यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक अमरावती शहरावरून जाणार असल्याची माहिती व्हायरल केली होती. त्या अनुषंगाने अनेक अमरावतीकरांनी घरूनच या दृश्याचे अवलोकन करून विलोभनीय दृश्याचा आनंद घेतला व ऐतिहासिक क्षणाला उपस्थिती दर्शविली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (स्पेस स्टेशन) बरेचदा अमरावती शहरावरून गेले आहे. मंगळवारी पहाटे त्याची तेजस्विता वजा २.२५ (अधिक) असल्यामुळे ते साध्या डोळ्यांनी सहज दिसले. या स्पेस स्टेशनने २५ जून रोजी पहाटे ४ वाजून ४३ मिनिटे ५ सेकंदाने नैऋत्येकडून अमरावतीच्या अवकाशात प्रवेश केला आणि ४ वाजून ४८ मिनिटे ३६ सेकंटाला ईशान्येकडे याचा प्रवास संपला. तब्बल साडेपाच मिनिटे हे अवकाश स्थानक अमरावतीकरांना पाहता आले. या दिवशीचा हा प्रवास सरासरी ४१५ कि.मी.उंचीवरून झाला. यावेळी अवकाश स्थानकाची गती ७.६६ किमी प्रतिसेकंद अशी प्रचंड होती. अमरावती शहरावरून ते जात असताना एखाद्या ठळक ताºयाप्रमाणे दिसल्याची माहिती खगोलशास्त्र विभागप्रमुख रवींद्र खराबे यांनी दिली.

पृथ्वीभोवती २४ तासांत १५.५२ फे ऱ्या 
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक २४ तासांत पृथ्वीभोवती १५.५२ फे ऱ्या  घालते. त्यामुळे या ठिकाणावरून दर ४५ मिनिटाला एक याप्रमाणे २४ तासांत १५ वेळा सूर्याेदय व सूर्यास्त पाहता येतात. या अवकाश स्थानकाच्या प्रकल्पात अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा, इटली व युरोप खंडातील काही देश असे एकूण १५ देश सहभागी आहेत. २० नोव्हेंबर १९९८ पासून या अवकाश स्थानकाच्या जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

असाध्य आजारांवरील औषधाचे संशोधन
पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण व वातावरणाचा दाब असल्यामुळे सूक्ष्म प्रयोगाचे निष्कर्ष मिळविण्यात अडथळा येतो. त्यामुळे अशा अवकाश स्थानकामध्ये शून्य गुरुत्वार्षणाच्या स्थितीत प्रयोग केले जातात. एड्स, डायबिटीज, कर्करोग, एन्फ्ल्यूऐंजा अशा असाध्य आजारांवर औषधी शोधण्याकरिता तसेच विविध समस्यांवरील प्रयोग या अवकाश स्थानकात संशोधक करीत असल्याची माहिती खराबे यांनी दिली.

Web Title: International Space Station from Amravati Space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.