विटेऐवजी शिक्षणाचा साचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:51 AM2018-12-10T00:51:00+5:302018-12-10T00:51:37+5:30

पोटाची भ्रांत असल्याने मुलींना शिकविणार कसे, हा वीटभट्टीवर काम करणाऱ्या अतिशय गरीब कुटुंबाचा प्रश्न बालरक्षकाच्या पाठपुराव्याने सुटला. त्यांच्या दोन मुलींसाठी शिक्षणाची दारे आता उघडी झाली आहेत.

Instead of Vita, | विटेऐवजी शिक्षणाचा साचा

विटेऐवजी शिक्षणाचा साचा

Next
ठळक मुद्देबालरक्षक ठरला देवदूत : दोन सख्ख्या बहिणींकरिता शिक्षणाची दारे झाली खुली

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : पोटाची भ्रांत असल्याने मुलींना शिकविणार कसे, हा वीटभट्टीवर काम करणाऱ्या अतिशय गरीब कुटुंबाचा प्रश्न बालरक्षकाच्या पाठपुराव्याने सुटला. त्यांच्या दोन मुलींसाठी शिक्षणाची दारे आता उघडी झाली आहेत.
अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडल्याने सुमित चवरे व त्यांच्या पत्नीला कधी शेतात मजुरी, तर कधी वीटभट्टीवर काम करून चरितार्थ चालवावा लागतो. दगड, माती, रेती, काँक्रीट, राख या साचेबद्ध ठोकळ्यात दोन मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेले. त्यातच गावात काम नसल्याने त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती सुरू केली. आपसूकच चौथीतील सुहानी व पाचवीतील राणी यांचे शिक्षण अर्ध्यातून सुटले. विटांच्या साच्यापुरतेच त्यांचे आयुष्य उरले होते. यांची माहिती उच्चश्रेणी मुख्याध्यापक जगदीश शिरसाट व मुख्याध्यापक सुभाष पुसदकर यांनी गटसाधन केंद्रातील बालरक्षक शेषराव चव्हाण यांना दिली. लगेच सुमित चवरे यांची भेट घेऊन शिक्षण हमी कार्डनुसार मुलींच्या शाळा प्रवेशाविषयी माहिती देण्यात आली. त्यांनी होकार दिल्यानंतर अंजनसिंगी येथून दोन्ही मुलींचे शिक्षण हमीकार्ड बनविले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी जुना धामणगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत सुहानी हिला इयत्ता चौथीत, तर दिव्यांग राणीला पाचवीत प्रवेश देण्यात आला. दोन्ही मुलींना लेखन साहित्य मिळाले तसेच शाळेचे शिक्षक व साधन व्यक्तींनी शाळेपर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था करण्याचे ठरविले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र गायकवाड, गटसमन्वयक गौतम गजभिये, केंद्रप्रमुख दिलीप चव्हाण, मुख्याद्यापक मधुकर तितुरमारे, धीरज जवळकर, कलेश कांबळे, वैशाली लिल्हर्वे, ज्योती राऊत, विषय साधन व्यक्ती व विशेष शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Instead of Vita,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.