न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:17 PM2018-07-11T22:17:32+5:302018-07-11T22:18:00+5:30

बडनेरा येथील रहिवासी वहिदा या महिलेने तृतीयपंथीयांचा चालविलेला छळ रोखण्यासाठी तृतीयपंथीयांनी बुधवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून न्याय मिळण्याची भूमिका मांडली. पोलिसांनी आम्हाला अपेक्षित असलेली बाजू समजून घेतली नाही. त्यामुळे पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेऊ व सदर महिलेविरोधात न्यायालयात जाऊ, अशी प्रतिक्रिया श्यामाबाई इंगोले या तृतीयपंथी यांनी दिली.

If you do not get justice, then run court | न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव

न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव

googlenewsNext
ठळक मुद्देपत्रपरिषद : छळ रोखण्यासाठी तृतीयपंथी एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा येथील रहिवासी वहिदा या महिलेने तृतीयपंथीयांचा चालविलेला छळ रोखण्यासाठी तृतीयपंथीयांनी बुधवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून न्याय मिळण्याची भूमिका मांडली. पोलिसांनी आम्हाला अपेक्षित असलेली बाजू समजून घेतली नाही. त्यामुळे पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेऊ व सदर महिलेविरोधात न्यायालयात जाऊ, अशी प्रतिक्रिया श्यामाबाई इंगोले या तृतीयपंथी यांनी दिली.
स्थानिक बडनेरा येथे राहत असलेल्या वहिदा नामक महिलेने तृतीयपंथीयांचा छळ केला आहे. तसेच तिच्याकडून आमच्या जीविताला धोकासुद्धा असल्याचा आरोप आम्रपाली जोगी यांनी केला. पोलिसांनी या महिलेविरुद्ध किरकोळ कारवाई करून तिला सोडून दिले. परंतु आम्हाला मात्र, अद्यापही खरा न्याय मिळालेला नाही. तृतीयपंथीयांची चांगलीच घुसमट होत असून, आमच्या कुठल्याही व्यथा ऐकून घेत नसल्याने आम्ही आता हतबल झालो आहे. बडनेरा पोलीस तर आमची कुठलीही तक्रार घेत नसल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे.
पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा नसल्याने आम्ही आता हा लढा न्यायालयातून लढू व न्यायालयातून संबंधितांवर गुन्हे दाखल करवून घेऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. वहिदा ही आमच्या कम्युनिटीची नसून ती एक महिला आहे. तिने महिले सारखंच राहवे व तृतीयपंथीयांवर जे अमानुष छळ करण्यात येत आहे तो थांबवावा, अशी मागणीही तृतीयपंथीयांनी यावेळी केली.
पत्रपरिषदेला श्यामाबाई इंगोले, रेखा जोगी, आम्रपाली जोगी, नगीना जोगी, पवनी मोरे यांच्यासह अनेक तृतीयपंथीयांनी हजेरी लावली होती. नुकतेच तृतीयपंथीयांनी त्यांच्यावर होत असलेल्या छळाविरोधात आवाज उठविला होता. तसेच पोलीस आयुक्तालयासमोर सोमवारी चक्काजाम आंदोलनही केले. त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदन सादर केले. याचे पडसाद बडनेरा येथील तृतीयपंथीयांमध्ये उमटले होते.

Web Title: If you do not get justice, then run court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.