‘अड्डा २७’ नोंदणीधारकांच्या मुसक्या आवळल्या

By admin | Published: July 17, 2017 12:09 AM2017-07-17T00:09:17+5:302017-07-17T00:09:17+5:30

"शॉप अ‍ॅक्ट"च्या नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या ‘अड्डा २७’ या हुक्का पार्लरच्या प्रोप्रायटरसह अन्य पाच जणांविरुद्ध

'HAndia 27' registrars will hear the rumors | ‘अड्डा २७’ नोंदणीधारकांच्या मुसक्या आवळल्या

‘अड्डा २७’ नोंदणीधारकांच्या मुसक्या आवळल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : "शॉप अ‍ॅक्ट"च्या नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या ‘अड्डा २७’ या हुक्का पार्लरच्या प्रोप्रायटरसह अन्य पाच जणांविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा नोंदविला. याप्रकरणी मनोज विष्णू बडनखे (४४,वृंदावन कॉलनी, साईनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. लोकमत"ने हुक्का पार्लरचे वास्तव लोकदरबारात उघड केल्यानंतर २० मे रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या दुकाने निरीक्षक अर्चना कांबळे यांनी अड्डा २७ विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
ठाणेदार मनीष ठाकरे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीअंती हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी बडनखे व अन्य पाच जणांविरुद्ध भादंविचे कलम ४१७, १७७, १८१, १८८ सह सार्वजनिक ठिकाणी धुूा्रपानास प्रतिबंधक अधिनियम २००८ चे कलम ४, सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (व्यापार व वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण, जाहिरात आणि विनियमन प्रतिबंध) अधिनियम २००३ च्या कलम ४ मधील तरतुदीनुसार १५ जुलैला रात्री ९.४४ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
बसस्थानक रस्त्यावरील अड्डा -२७ या हुक्का पार्लरच्या आस्थापना मालकाने स्वयंघोषणापत्र व स्वयं साक्षांकित करून सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला चुकीची माहिती देऊन नोंदणीप्रमाणपत्राच्या आधारे हुक्का व डॉन्स पार्लर चालविले जात होते. बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी हा संतापजनक प्रकार उघड केला होता. त्यानंतर "तोकड्या कपड्यात थिरकतात मुली" या मथळ्याखाली "लोकमत"ने अंबानगरीत नव्याने रुजू पाहणाऱ्या हुक्का पार्लर संस्कृतीवर प्रकाश टाकला होता.

बडे मासे गळाला
तूर्तास हुक्का पार्लर प्रकरणात अड्डा -२७ या आस्थापनेचा "प्रोप्रायटर" मनोज बडनखे याला अटक करण्यात आली. अन्य पाच जणांनाही अटक होण्याची शक्यता आहे. ते लब्धप्रतिष्ठित असल्याने अटकेची कुणकुण लागताच अटकपूर्व जामीन मिळविण्याची धडपड करू शकतात, हे लक्षात घता पोलिसांनी त्यांची नावे उघड केलेली नाहीत. बडनखेने चौकशीदरम्यान काही बड्या मासांची नावे पोलिसांसमोर उलगडली आहेत.

सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या दुकाने निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये शॉप अ‍ॅक्टचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून मनोज बडनखेला अटक करण्यात आली.
- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली पोलीस ठाणे

Web Title: 'HAndia 27' registrars will hear the rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.