शासनाने विदर्भाच्या सिंचनाची श्वेतपत्रिका काढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:19 PM2017-11-24T23:19:23+5:302017-11-24T23:19:49+5:30

मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी.

Government should take whitepaper of irrigation of Vidarbha | शासनाने विदर्भाच्या सिंचनाची श्वेतपत्रिका काढावी

शासनाने विदर्भाच्या सिंचनाची श्वेतपत्रिका काढावी

Next
ठळक मुद्देसुनील तटकरे : हल्लाबोल आंदोलनातून फसवे सरकार खाली खेचू

आॅनलाईन लोकमत
अमरावती : मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी. विदर्भात जी काही सिंचन क्षमता वाढले, ती आघाडी शासनाच्या काळातील असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे केला.
सुनील तटकरे हे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित विभागीय पदाधिकारी मेळाव्यात आले होते. त्यांनी पत्रपरिषदेतून भाजप सरकारवर हल्ला चढविला. राज्यातील सर्व शेतकºयांना २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्याकरिता ‘डिजिटल महाराष्ट्र’च्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला, तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आॅनलाइन प्रक्रि येत घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले. प्रधान सचिव गौतम प्रधान यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र, एवढ्यावर हा प्रश्न सुटणार नाही. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, गृहिणी या सर्वांना हे अपयशी सरकार नकोच आहे, असे तटकरे म्हणाले. विधान परिषदेत भाजपसोबत हातमिळवणी करणार काय, या प्रश्नावर तटकरे म्हणाले, सत्तेसाठी तडजोड करणार नाही. समविचारी पक्षांसोबत मैत्री करू.
विदर्भात सिंचन अनुशेषवाढीला पश्चिम महाराष्ट्रातील नेते जबाबदार असल्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, विदर्भात सिंचन वाढले ते केवळ आघाडी सरकारच्या कार्यकाळात. खुद्द नितीन गडकरींनी २३.५ टक्के सिंचन असल्याचे एका कार्यक्रमात जाहीर केल्याचा मुद्दा तटकरेंनी यावेळी नमूद केला. सिंचन घोटाळा आरोपाच्या पार्श्वभूमीवर तटकरेंने छेडले असता, ते म्हणाले, मी चौकशीला घाबरत नाही. १२ डिसेंबर २०१४ पासून चौकशी सुरू असून, पूर्णत: सहकार्य करीत आहे. खरेच घोटाळा झाला काय, हे राज्यातील १२ कोटी जनतेसमोर एकदाचे यावे, ही माझीसुद्धा मागणी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत जास्त बोलता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
माजी मंत्री अनिल देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, रमेश बंग, सुभाष ठाकरे, वसुधा देशमुख, संदीप बाजोरिया, आ. प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, वसंत घुईखेडकर, सुरेखा ठाकरे, सुनील वºहाडे, बाबा राठोड आदी यावेळी उपस्थित होते.
नागपुरात १२ डिसेंबर रोजी सरकारविरोधी हल्लाबोल
शेतकºयांना आरोपींच्या पिंजºयात उभे करणाऱ्या राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीने यवतमाळातून १ नोव्हेंबरपासून दिंडी यात्रेचे आयोजन केले आहे. नागपुरात १२ डिसेंबरला पुरोगामी विचारसरणीचे पक्ष एकत्र येणार असून, सरकारविरोधी हल्लाबोल सभेला खा. शरद पवार हे संबोधित करतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

 

Web Title: Government should take whitepaper of irrigation of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.