दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:06 PM2018-10-02T22:06:00+5:302018-10-02T22:06:26+5:30

खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.

Give us freedom without a shield ... | दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल...

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल...

Next
ठळक मुद्देराष्ट्रपित्याला दीडशेव्या जयंतीला नमन चरख्यावर १० तास सूतकताई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.
शहरातील जिल्हा उद्योग कार्यालय परिसरात सकाळी ८ वाजता सूत कताई महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय ठरली. दरम्यान, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ यांनी येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. पालकमंत्र्यांनी चरख्यावर सूतकताई केली. येथे हात चरखा, पेटी चरखा, अंबर चरखा असे सुमारे ५० प्रकारचे चरखे होते. या महोत्सवाला मूर्त रूप देण्यासाठी कस्तुरबा समिती आणि शाश्वत कन्सेप्ट स्कूलचे सहकार्य लाभल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले. सूतक ताई महोत्सवात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक नीलेश निकम, एमसीईडीचे विभागीय अधिकारी अभिराम डबीर प्रामुख्याने उपस्थित होेते.
चरख्याला मिळाले सौरऊर्जेचे बळ
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिशकाळात विदेशी वस्तू, साहित्य वापरावर बहिष्काराचे अस्त्र उगारले. स्वदेशी हा मूलमंत्र देताना गांधीजींनी चरख्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. हातचरखा याला आजही गांधी चरखा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर गांधीजींनी पेटी चरख्याची संकल्पना साकारली, जेणेकरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने हाताळता येईल. १९६० च्या सुमारास अंबर चरखा अस्तित्वात आला. ही आताच्या सोलर चरख्याची पहिली पायरी होती. नंतर सौरऊर्जेचे बळ मिळून सौर चरखा अस्तित्वात आला. आज गाव-खेड्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून चरख्याद्वारे सूतकताई आणि वस्त्रनिर्मितीचे दालन उभे झाले आहे. खादी वस्त्रांना महानगरातही मागणी वाढली असून, रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Web Title: Give us freedom without a shield ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.