पोलिसांची हप्तेखोरीने गँगवॉर, अवैध धंद्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 09:50 PM2018-11-16T21:50:57+5:302018-11-16T21:52:09+5:30

गांजा, दारू, गुटखा, वरली मटका, चोऱ्या, हाणामारी, लुटपाट, दरोडे, हत्या आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा बुधवारचा प्रकार शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणारा ठरला आहे. अलीकडच्या घटनांवरून येथे आता गँगवार जन्म घेत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

Gangavors, illegal trafficking in the custody of the police | पोलिसांची हप्तेखोरीने गँगवॉर, अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पोलिसांची हप्तेखोरीने गँगवॉर, अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Next
ठळक मुद्देबारूदच्या ढिगारावर जुळे शहर : तरुणांमध्ये गांजा, दारूचे वाढले प्रमाण; वर्चस्वाची लढाई

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : गांजा, दारू, गुटखा, वरली मटका, चोऱ्या, हाणामारी, लुटपाट, दरोडे, हत्या आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा बुधवारचा प्रकार शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणारा ठरला आहे. अलीकडच्या घटनांवरून येथे आता गँगवार जन्म घेत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
परतवाडा, अचलपूर शहरातील युवक मोठ्या प्रमाणात गांजा, दारूच्या आहारी गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने पूर्वीच प्रकाशित केले. शहरात खाकी वर्दीचा धाक नसल्याचे चित्र दररोजचे आहे. परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांच्या यादीत दिवसागणिक भर पडत आहे. ज्या प्रकरणाशी कुणाचा काही संबंध नाही, त्यावरून सर्वसामान्य नागरिक व व्यापाºयांना वेठीस धरून दहशत पसरवून आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचे हे प्रयत्न असल्याचे पुढे आले आहे.
गँगवॉर तयार करण्याचा प्रयत्न
अचलपूर शहरात बारूद व परतवाडा शहरात लल्ला नामक गँग आहेत. पोलिसांना त्याची माहिती आहे. या गँगमधील सदस्य गांजा व दारूच्या आहारी गेले असून, अवैध धंदे, चोरी, हाणामारीतून दहशत पसरविणे त्यांचे कार्य आहे. मंगळवारी रात्री ९.३० वाजता दीपक ऊर्फ झांशी कुंबलेले याने त्याचा एकेकाळचा जीवलग मित्र सल्लू ऊर्फ सलमानची धारदार शस्त्राने हत्या केली. त्याच्यासोबत लल्ला ठाकूर व पवन नामक युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक ऊर्फ झांशी याने परतवाडा ठाण्यात जाऊन स्वत: आत्मसमर्पण केले, तर दोघे अजूनही पसार आहेत. बुधवारी या घटनेशी तीळमात्र संबंध नसलेल्या व्यापाºयांच्या प्रतिष्ठानांवर विशिष्ट समाजाच्या लोकांनी दगडफेक, चाकुहल्ला केला. त्यात पप्पू मिर्झा, अजहर, जुबेर शाह, मोहसीन, शब्बीर, इरफान, इमू बाबाभाई, सोहेल, चांदभाई, सोनू, कजिरोद्दीन, मोनू इमरान बिल्डर, फिक इब्राहिमसह इतर ६० ते ७० हल्लेखोरांविरुद्ध दरोडा, हत्येचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व लोकांना घेऊन टोळीप्रमुख आपली वेगळी गँग बनविण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आला असताना परतवाडा ठाणेदार किंवा पोलिसांचा वचक शहरावर नसल्याचे चित्र आहे. ठाणेदारांवर निष्क्रियतेचा ठपका जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; मास्टर माइंड कोण?
दुकानांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि व्यापारी या दोघांचाही संबंध मंगळवारीचा मृत युवक व खून करणाºया आरोपींसोबत नाही. असे असताना मोठा जमाव करून व्यापाºयांवर प्राणघातक हल्ला व दरोडा टाकत सामानाची नासधूस करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा म्होरक्या कोण, याचा शोध पोलिसांना घेणे गरजेचे ठरले आहे. ४० ते ५० च्या संख्येने असलेल्या हल्लेखोरांनी कट रचून दगडफेक, लुटपाट, चाकुहल्ला केल्याचे स्पष्ट होते. या परिसरातील व्यापाºयांमध्ये खळबळ माजवून दहशत पसरविण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सत्ताधाऱ्यांनी तात्काळ मुंबईतील वरिष्ठ नेत्यांना दिला. मंगळवारी झालेल्या हत्येच्या घटनेशी तीळमात्र संबंध नसताना बुधवारी करण्यात आलेल्या दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज शहरात व्हायरल झाल्याने ठिकठिकाणी त्याची चर्चा सुरू आहे
पाच आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी
व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक व चाकुहल्ला करणाऱ्या ४० ते ५० हल्लेखोरांपैकी पाच जणांना परतवाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली मोहम्मद अजहर मोहम्मद इकबाल (३२), गोलू (२६, रा. छोटा बाजार), शोएब शब्बीर (२५), फईन खान मोहम्मद (२८, अन्सारनगर) व मोहम्मद परवेज मोहम्मद आसिफ (गरीब नवाज कॉलनी ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी अचलपूर न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Gangavors, illegal trafficking in the custody of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.