गणेशभक्तांना पाजले शेवाळयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:45 PM2018-09-24T22:45:41+5:302018-09-24T22:46:08+5:30

येथील छत्री तलावावर कृत्रिम तलाव तयार करून येथे महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. पण, तेथील पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये चक्क शेवाळ व कचरा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार रविवारी उघडकीस आला.

Ganesh worshipers get water molasses water | गणेशभक्तांना पाजले शेवाळयुक्त पाणी

गणेशभक्तांना पाजले शेवाळयुक्त पाणी

Next
ठळक मुद्देमहापलिकेचा प्रताप : नागरिकांच्या आरोग्याला धोका, व्हिडीओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील छत्री तलावावर कृत्रिम तलाव तयार करून येथे महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. पण, तेथील पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये चक्क शेवाळ व कचरा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार रविवारी उघडकीस आला.
दूषित पाणी असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर हे बिंग फुटले. महापालिकेचा गलथान कारभार नागरिकांच्या जिवावर उठल्याचे हे चित्र बघून वाहतूक पोलिसांनी बारकाईने निरीक्षण हा प्रकार चव्हाट्यावर आला. हा प्रकार
'लोकमत'ने आॅनलाईन व्हायरल करून लोकदरबारात मांडला. यावेळी एकीकडे गणपती बाप्पा मोऱ्याचा जयघोष होत असताना दुसरीकडे थकलेले नागरिक सदर पाण्याच्या कॅनमधुन आपली तृष्णा भागवित होते. काही नागरिकांनी पिण्याच्या बॅगची तपासणी केली असता . या मध्ये पाणी दूषित व कचरासुद्धा पाण्यात आढळून आला. येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत होते. त्या कारणाने दूषित पाणी नागरिकांना पाजण्याचा गंभीर प्रकार हा महापालिकेच्या संबंधित विभागाकडून झाला. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. हा तर नागरिकांच्या आरोग्याशी शुद्ध खेळ असल्याची भावना जनमाणसांतून व्यक्त होत होती. शहरात अस्वच्छतेने सर्वत्र थैमान घातले आहे.
तसेच मागील दोन महिन्यांत सर्वाधिक डेंग्यूचे व स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आता दूषित पाणी पोटात गेल्याने विविध प्रकारचे जलजन्य आजार सुध्दा होत आहेत. दूषित पाणी पिल्याने कावीळ, पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा नागरिकांच्या जिवीताशी खेळ तर नाही ना, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
ऐनवेळी बोलावल्या १०० कॅन
छत्री तलावावर गणेश विसर्जनासाठी खड्डे खोदणे, बॅरीकेट्स लावणे, विसर्जनस्थळी सीसीटिव्ह कॅमेरे लावणे, निर्माल्य बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे असे नियोजन होते. परंतु, पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. बांधकाम विभागाच्या एका शाखा अभियंत्यानी ऐनवेळी १०० कॅनची व्यवस्था केली ही बाब पुढे आली आहे.
संबंधितांवर कारवाई केव्हा?
महापालिकेच्या एका शाखा अभियंता यांनी वेळेवर नागरिकांना पाणी पिण्यासाठी एका खासगी कॅन व्यावसायिकाला १०० कॅनची आर्डर दिली. त्यांनी या ठिकाणी व्यवस्था सुध्दा केली. पण, पाण्याच्या कॅनला शेवाळ लागली होती. व पिण्याच्या पाण्यामध्ये कचरा असल्याने व सदर पाणी दूषित असल्याने ते नागरिकांच्या पोटात गेले यातून विविध जलजन्य आजारा होऊ शकतात.

Web Title: Ganesh worshipers get water molasses water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.