गजानन आत्रामची पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:19 PM2018-12-18T23:19:38+5:302018-12-18T23:19:54+5:30

सिनेस्टाईल पाठलाग करून चोरी प्रकरणातील आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी गद्रे चौकातून ताब्यात घेतले. गजानन अरुण आत्राम (३३, अशोकनगर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध आतापर्यंत ४५ गुन्ह्यांची नोंद आहे.

Gajanan patriot police racket | गजानन आत्रामची पोलिसांवर दगडफेक

गजानन आत्रामची पोलिसांवर दगडफेक

Next
ठळक मुद्देआरोपीचा पाठलाग : गद्रे चौकात पकडले, ४५ गुन्ह्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सिनेस्टाईल पाठलाग करून चोरी प्रकरणातील आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी गद्रे चौकातून ताब्यात घेतले. गजानन अरुण आत्राम (३३, अशोकनगर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध आतापर्यंत ४५ गुन्ह्यांची नोंद आहे.
गाडगेनगर पोलीस विलासनगर नजीकच्या अशोकनगर येथून गजाननचा पाठलाग करीत होते. दुचाकीने पळ काढणाऱ्या गजाननला दुचाकीने आलेल्या चौघा पोलिसांनी राजापेठच्या गद्रे चौकात पकडले. मात्र, त्यापूर्वी बचावासाठी त्याने पोलिसांवर दगडफेक केल्याने खळबळ उडाली होती. गद्रे चौकात बघ्यांची गर्दी जमल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
गाडगेनगर हद्दीतील अशोकनगरचा रहिवासी गजानन आत्रामच्या कारनाम्यांना पोलीस हैराण झाले आहेत. विविध गुन्ह्यांत पोलिसांनी गजाननला अनेकदा अटक केली; न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाल्याचा इतिहास आहे. गेल्या महिन्याभरात गजानन आत्रामविरुद्ध चार गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
यापूर्वीचे ४५ गुन्हे गजानन आत्रामवर दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी गजानन व त्याच्या साथीदाराने रामपुरी कॅम्प स्थित हरे माधव मंदिरातून दानपेटी चोरून नेली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा शिव मंदिरात चोरी केली. याशिवाय एका व्यक्तीचा कटला चोरला आणि एका महिलेची छेडखानी केली. या तिन्ही गुन्ह्यात गाडगेनगर पोलीस गजाननचा शोध घेत होते.
दरम्यान, मंगळवारी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी बबलू येवतीकर, रणजित गावंडे, सतीश देशमुख, विशाल वाकपांजर व शेख जहीर यांनी गजानन आत्रामला ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालविले. अशोकनगरातून दुचाकीवर निघालेल्या गजाननने पाठलाग होत असल्याचे पाहताच कॉटन मार्केट मार्गाने भरधाव इर्विन ते राजापेठकडे जाणाºया उड्डाणपुलावर दुचाकी नेली.
अखेर राजापेठ स्थित गद्रे चौकात पोलिसांनी गजाननला गाठले. वर्दळीत पोलिसांनी गजाननला पकडण्यासाठी घेराव घातला. त्यावेळी त्याने रस्त्यावरील दगड उचलून पोलिसांवर भिरकावले. ते चुकवित पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाननला ताब्यात घेतले.

Web Title: Gajanan patriot police racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.