सपन प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:08 PM2018-09-22T23:08:28+5:302018-09-22T23:08:55+5:30

सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते.

Four doors of the dream project were opened | सपन प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडले

सपन प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडले

Next
ठळक मुद्देधरणात ९४ टक्के साठा : शहानूर ६८, चंद्रभागा ७६, पूर्णा प्रकल्पात ५२ टक्के जलसाठा

अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते. शनिवारी पाण्याचा येवा वाढल्याने पूर्ण दुपारी २ वाजता चारही गेट १० सेंमीमिटरने उघडल्या गेलेत. शनिवारी सकाळी ७ वाजता धरण ९३.७७ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १० सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. सकाळी सव्वानऊच्या दरम्यान धरण ९४.२८ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १५ सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. धरणाऱ्या जलसाठ्यात वाढ होत गेल्यास दरवाजे आणखी उघडावे लागणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. सपन प्रकल्पस्थळी व परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ ते ९ दरम्यान ४० एमएम पाऊस पडला. सायंकाळी ९ ते सकाळी ६ पर्यंत १२० एमएम पाऊस पडला. प्रकल्पस्थळी २४ तासांत ६५ एमएम तर कॅचमेन्ट क्षेत्रात १६० एमएम पावसाची नोंद आहे.
परिसरात सतत पाऊस पडत असतानाही शुक्रवारला सायंकाळी ८.३० पर्यंत कुणीही अधिकारी प्रकल्पस्थळी उपस्थित नव्हते. केवळ दोन चौकीदार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. सायंकाळी ८.३० च्या दरम्यान आवनकर नामक कनिष्ठ अभियंता प्रकल्पस्थळी पोहचलेत. तर यानंतर १० वाजताच्या दरम्यान उपविभागीय अभियंता इंदूरकर आणि हांडे दाखल झालेत. प्राप्त माहितीनुसार हे सर्व संबंधित अधिकारी अमरावतीला त्यावेळेस उपस्थित होते.
गणपती विसर्जनाकरिता धरणातील पाणी सोडण्यात यावे याकरिता अचलपूर एसडीओ व्यंकट राठोड यांनी कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून शुक्रवारलाच संपर्क साधला होता. दरम्यान सायंकाळी पावसाचे प्रमाण वाढले आणि सपन प्रकल्प ९४ टक्के भरले. यात प्रकल्प अधिकाºयांनी दरवाजे उघडलेत आणि गणेश विसर्जनाकरिता पाणी उपलब्ध झाले. गणपती पावलेत, एसडीओ व्यंकट राठोड यांची इच्छा आपोआप पूर्णत्वास गेली.
अचलपूर तहसील अंतर्गत येत असलेल्या सपन प्रकल्पासह शहानूर धरण ६८ टक्के, तर चंद्रभागा धरण ७६ टक्के भरले आहे. चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्प केवळ ५२ टक्केच भरले आहे. शहानूर, चंद्रभागा, पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याचा सध्या तरी प्रश्न नाही. धरण ९० टक्क्यांच्यावर भरतील तेव्हाच दरवाजे उघडण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Four doors of the dream project were opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.