अमरावतीतल्या चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणात पाच जण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:34 AM2017-10-26T05:34:31+5:302017-10-26T05:34:38+5:30

चिखलदरा (अमरावती) : चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणात बुधवारी वनविभागाने पाच जणांना अटक केली.

Five people were killed in the case of Chav-Yaman bark bear hunting case in Amravati | अमरावतीतल्या चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणात पाच जण गजाआड

अमरावतीतल्या चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणात पाच जण गजाआड

Next

चिखलदरा (अमरावती) : चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणात बुधवारी वनविभागाने पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून एक नख आणि विळा जप्त करण्यात आला. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आकाश भोला बेलसरे (२२), बजरंग देवीदास बेलसरे (२६), श्रीराम गंगाराम बेलसरे (३४), भानुदास बुडा बेलसरे (३५) आणि दिनेश रामकिसन दहीकर (२६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पूर्व मेळघाट वनविभागाच्या अंजनगाव परिक्षेत्रांतर्गत येणाºया चौºयामल गावालगत १७ आॅक्टोबर रोजी अस्वलाची शिकार करण्यात आली होती.
या प्रकरणात चार पंजे अद्याप सापडलेले नाहीत.
>अस्वलाचा हल्ला
सेमाडोह नजीकच्या जंगलातून गुरे घेऊन परतणाºया गुराख्यावर अस्वलाने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. पंढरी विठ्ठल शनवारे (३५) असे जखमीचे नाव आहे. पंढरीला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Five people were killed in the case of Chav-Yaman bark bear hunting case in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक