स्व-रक्षणासाठी हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:53 PM2017-10-29T22:53:33+5:302017-10-29T22:54:09+5:30

लघुशंकेवरून उफाळलेल्या वादानंतर तलवार व लाठीने हल्ला चढविणाºया युवकांचा संभाव्य धोका लक्षात घेता युवा काँग्रेसचे अनिकेत देशमुख यांनी रिव्हॉल्वरने हवेत फायरिंग केली.

Firing in the air for self-protection | स्व-रक्षणासाठी हवेत गोळीबार

स्व-रक्षणासाठी हवेत गोळीबार

Next
ठळक मुद्देलघुशंकेवरून उफाळला वाद : दोन आरोपींना अटक, अन्य पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लघुशंकेवरून उफाळलेल्या वादानंतर तलवार व लाठीने हल्ला चढविणाºया युवकांचा संभाव्य धोका लक्षात घेता युवा काँग्रेसचे अनिकेत देशमुख यांनी रिव्हॉल्वरने हवेत फायरिंग केली. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास फे्रजरपुरा हद्दीतील कॅम्प कॉर्नर बारजवळ घडली. या घटनेमुळे फ्रेजरपुरा परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये अनिकेत देशमुख व तौसीफ अहमद यांच्या गटाविरुध्द फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहे.
पोलीस सूत्रानुसार, चपराशी पुरालगत कॅम्प पॉईन्ट बारमधून तौसिफ अहमद वल्द शेख हसन व जियाउर रहेमान ऊर्फ बबलू यांनी बारच्या बाजूला भिंतीलगत लघुशंका केली. कॅम्प पॉईन्टबाजुलाच अनिकेत देशमुख यांचे निवासस्थान असल्याने त्यांची आईसुध्दा घराच्या आवारात उभी होती. देशमुख यांचा शनिवारी वाढदिवस होता. त्यामुळे अनिकेत व त्यांचे मित्रसुध्दा घराजवळ उभे होते. त्यांनी हा प्रकार बघून तौसिफ व जियाउरला लघुशंका केल्याबाबत हटकले. याच मुद्यावरून अनिकेत व तौशिफ यांच्यात वाद उफाळला. धक्काबुक्कीनंतर हाणामारी होऊन अनिकेत देशमुख, त्यांचा मित्र संग्राम देशमुख व अंकुश डहाके यांच्यासह दुसºया गटातील तौसिफ व जियाउर रहेमान जखमी झाले. हा गोंधळ सुरू असताना हल्ल्याचा संभाव्य धोका पाहता जीव वाचविण्यासाठी अनिकेतने हवेत गोळीबार केला. याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक पोलीस आयुक्त व फे्रजरपुºयाचे ठाणेदार राहुल आठवले यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी तणावसदृशी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
अनिकेत देशमुख यांच्याकडे रिव्हॉल्वरचा परवाना असून त्यांनी स्व-रक्षणासाठी हवेत फायरिंग केली. दुसºया गटातील तरुणांनी तलवार व लाठ्यांनी हल्ला चढविल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याअनुषंगाने फे्रजरपुरा पोलिसांनी अनिकेतजवळील रिव्हॉल्वर व तौसिफकडून तलवार व लाठी जप्त केली. या घटनेची माहिती राज्यस्तरावर पोहोचली असून पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अमरावती पोलिसांना विचारणा करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत या घटनेचा आढावा घेतला जात आहे.
दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल
अनिकेत देशमुख यांच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी जियाउर रहेमान, तौसिफ अहमद व अन्य चार जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ४/२५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला. तौसीफ अहमदच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिकेत देशमुख, संग्राम देशमुख, अंकुश डहाकेसह चौघांविरुद्ध ३२४, १४३, १४७, १४९, ५०४ ३/२५ आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तौसिफ व जियाऊरला अटक केली असून देशमुख गटातील एकास अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी तिघांना न्यायालयात हजर केले.
तौसिफच्या वाहनाची तोडफोड
तौसिफ व त्याचा मित्र जियाऊर यांच्यासह चारजण एमएच ०४ डीएन८४२३ या वाहनाने बारमध्ये आले होते. दरम्यान झालेल्या हाणामारीनंतर अनिकेत देशमुख यांच्या गटातील सदस्यांनी तौसिफ याने चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप तौसिफने केला आहे.
यशोमती ठाकूर, संजय बंड घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर व माजी आमदार बंड घटनास्थळी यांनी भेट देऊन फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. हा वाद विकोपाला जाऊ नये याची खबरदारी घेण्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य बघता फे्रजरपुरा पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे नोंदविले.

Web Title: Firing in the air for self-protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.