खर्च २७ हजार, हाती आले १२ हजार; सांगा कसेभागायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:38 PM2017-11-03T23:38:57+5:302017-11-03T23:39:48+5:30

‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या.

The expenditure was 27 thousand; Tell me how | खर्च २७ हजार, हाती आले १२ हजार; सांगा कसेभागायचे?

खर्च २७ हजार, हाती आले १२ हजार; सांगा कसेभागायचे?

Next
ठळक मुद्देसमृद्धीच्या योजना कागदावरच शेतकºयांच्या कर्जाच्या खाईत गटांगळ्या

धीरेंद्र चाकोलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या. मात्र, त्या कागदावरच आहेत, तर शासकीय यंत्रणा नवीन पिकांच्या प्रचार-प्रसाराबाबत उदासीन आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील श्यामराव देशमुख यांच्यासारख्या अनेक शेतकºयांची पारंपरिक पिके काढून कर्जबाजारी होण्यातच जिंदगानी चालली आहे.
बोरी येथे भाऊराव श्यामराव देशमुख यांचे ४ एकर १८ गुंठे (१ हेक्टर ७८ आर) शेती आहे. त्यांनी यंदा खरिपातील पेरणीसाठी ६६ हजार रुपये बँकेकडून कर्जाची उचल केली आणि शेतात सोयाबीन व तुरीचा पेरा केला. शेती तयार करण्यापासून पीक बाजारात विकण्यापर्यंत आलेला एकूण खर्च २७ हजार ५०० रुपये त्यांनी टिपणवहीत नोंदवून ठेवला. ही रक्कम पिकांकरिता वारेमाप खर्च करणाºया इतर शेतकºयांच्या तुलनेत माफक असली तरी त्यांना झालेल्या उत्पन्नाचा आकडा पाहता, तीन महिने घेतलेल्या अफाट कष्टाचे चीज झाले काय, असा प्रश्न पडतो. या चार एकरातून काढलेल्या ९ क्विंचल ६५ किलो सोयाबीनची त्यांनी बाजारात विक्री केली असता, १४ हजार ६०४ रुपये त्यांच्या हातात पडले. त्यांना आताच १३ हजार रुपये तोटा सहन करावा लागला आहे. शेतात उभी असलेली तूर थेट मार्चमध्ये हाती येईल तोपर्यंत व्यवहार कशावर भागवायचे, हा त्यांचा थेट प्रश्न आहे.
भावही पडले : गेल्या दोन वर्षांपासून शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून व्यापारी खरेदी करीत आहेत. अमरावती येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत विकूनही अवघा १५५० रुपये प्रतिक्विंटल भावाने ९६५ किलो सोयाबीनचे १४ हजार ७९८ रुपये अडत्याने नोंदवले. त्यामधूनही अडत, मापाई, फुडाई, उतराई, कटाई असे मिळून १८४ रुपये कापून घेण्यात आले. त्यामुळे १४ हजार ६०४ रुपये देशमुख यांच्या हाती पडले.
कृषी विभागाच्या योजना कोणासाठी?
एम किसान, शेतकरी उत्पादक कंपनी, जमीन आरोग्य पत्रिका, गुणवत्तापूर्ण बियाणे व खतांची उपलब्धता, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, आंतरपीक पद्धतीस प्रोत्साहन, फलोत्पादन वृद्धीसाठी विशेष अभियान आदी शासकीय उपक्रम व योजना राबविल्या जातात. तरीही शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला जात आहे. या योजना नेमक्या कोणासाठी, याबाबत शेतकºयांमध्ये अनभिज्ञता व ग्रामपातळीवर जनजागृतीबाबत औदासीन्य आहे.
उत्पादन घटले
काही वर्षांपूर्वी सोयाबीनचे हमखास पीक मानले जायचे. मात्र, त्याची उत्पादकता अलीकडच्या वर्षांमध्ये घटत आहे. यंदा एकरी किमान पाच क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना केवळ दोन-अडीच क्विंटल प्रतिएकर उतारा मिळाला. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला.

Web Title: The expenditure was 27 thousand; Tell me how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.