जिल्हा मार्गावरील आठ टक्के खड्डे कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:56 PM2017-12-16T22:56:44+5:302017-12-16T22:57:49+5:30

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत ‘खड्डेमुक्त राज्य’चा आदेश दिला होता.

Eight per cent potholes on the district road will always be | जिल्हा मार्गावरील आठ टक्के खड्डे कायमच

जिल्हा मार्गावरील आठ टक्के खड्डे कायमच

Next
ठळक मुद्देराज्य मार्ग १०० टक्के खड्डेमुक्त : १५ डिसेंबरला संपली खड्डेमुक्तीची डेडलाईन

आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत ‘खड्डेमुक्त राज्य’चा आदेश दिला होता. ही डेडलाइन संपल्यानंतर प्रमुख जिल्हा मार्ग ( एमडीआर) वरील अद्याप आठ टक्के खड्डे कायम असल्याची माहिती आहे. दरम्यान, खड्डे बुजविण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने उर्वरित खड्ड्यांवर आता लक्ष राहणार आहे.
जिल्ह्यात खड्डेमुक्तीसाठी ७० कोटींच्या ई-निविदा काढून ती कामे झपाट्याने पूर्ण करण्याचा निर्धार बांधकाम विभागाने केला आहे. पण, काही रस्त्यांची कामे १५ डिसेंबरपर्यंत करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले नाही. जिल्ह्यात १८६७.७४ किमी लांबीचे राज्य मार्ग आहेत, तर १६०३.५४ किमी लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. त्यामध्ये ५५६.६ किमी राज्य मार्गावर आणि ४६९.९० किमी जिल्हा मार्गावर खड्डे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी निविदा काढून कामास सुरुवात केली. जिल्ह्यातील राज्य मार्ग शंभर टक्के खड्डेमुक्त करण्यात आले आहेत, तर ४३२.६१ किमी प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त झाले आहेत. याची टक्केवारी ९२.०६ टक्के एवढी आहे. यामध्ये यामध्ये विशेष प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग (अमरावती) तसेच अमरावती, दर्यापूर, अचलपूर या डिव्हिजनमधील रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले आहेत.
उर्वरित खड्ड्यांसाठी आंदोलन सुरूच
बांधकाम विभागाने शंभर टक्के खड्डे भरण्यात आल्याचा दावा केला असला तरी अनेक मार्गावर खड्डे ‘जैसे थे’ असल्याचा आरोप करीत अनेक पक्ष, पुढारी आंदोलन करीत आहेत. शिवसेनेने शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन केले. वलगाव मार्गावर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी वलगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

Web Title: Eight per cent potholes on the district road will always be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.