चुकीच्या उपचारामुळे चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:44 PM2018-10-17T21:44:07+5:302018-10-17T21:44:31+5:30

चुकीच्या उपाचारामुळे चिमुकला दगावल्याची तक्रार कोकर्डा येथील पित्याने खल्लार पोलीस ठाण्यात दिली. मंगळवारी रात्री मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टर पसार झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Due to wrong treatment sperm of death | चुकीच्या उपचारामुळे चिमुकल्याचा मृत्यू

चुकीच्या उपचारामुळे चिमुकल्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देडॉक्टर पसार : पालकांची खल्लार पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : चुकीच्या उपाचारामुळे चिमुकला दगावल्याची तक्रार कोकर्डा येथील पित्याने खल्लार पोलीस ठाण्यात दिली. मंगळवारी रात्री मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टर पसार झाल्याची माहिती पुढे आली आहे.
कोकर्डा येथील समाधान सिरसाट यांनी मुलगा शुभम (३) याला सर्दी झाल्याने मंगळवारी सायंकाळी गावातीलच डॉ. सिकंदर सरकार याच्या खाजगी दवाखान्यात नेले. तेथे त्याला इंजेक्शन देण्यात आले. उपचारानंतर मुलाला घेऊन घरी जात असताना त्याने रस्त्यातच मान टाकली. यामुळे समाधान सिरसाट यांनी तातडीने त्याला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्याने चिमुकल्याचा बळी गेल्याचा आरोप समाधान सिरसाट यांनी खल्लार पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे. मुलाचे शवविच्छेदन दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहेत.
दरम्यान, औषधोपचार केल्याने चिमुकल्या शुभमचा मृत्यू झाल्याची कुणकुण लागताच डॉक्टर सरकार रुग्णालयातून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. या ‘झोलाछाप डॉक्टर’चे त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र खरे की खोटे, याबाबत तालुक्यात सर्वत्र चर्चा झडत आहे.


मृताच्या पालकाची तक्रार प्राप्त झाली. डॉक्टरांचे वैद्यकशास्त्रातील प्रमाणपत्र तपासण्यात येईल. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरणार आहे.
- शुभांगी आगासे, ठाणेदार, खल्लार

Web Title: Due to wrong treatment sperm of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.