गर्भवतीच्या मृतदेहाची जाळून विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:04 AM2018-04-23T01:04:14+5:302018-04-23T01:04:14+5:30

अमरावतीतील थरारक घटना : पोलीस प्रियकराच्या कृत्याचा नऊ महिन्यांनी उलगडा

Disposal of the pregnancy burns | गर्भवतीच्या मृतदेहाची जाळून विल्हेवाट

गर्भवतीच्या मृतदेहाची जाळून विल्हेवाट

अमरावती/परतवाडा : पोलीस कर्मचारी असलेल्या प्रियकराने गर्भवती मुलीचे अपहरण व हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना जुलै २०१७ मध्ये अचलपूर तालुक्यातील सुलतानपुरा परिसरात घडली होती. आरोपींच्या केलेल्या चौकशीत रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळावरून काही पुरावे ताब्यात घेतले आहेत. ९ जुलै २०१७ रोजी पुरुषोत्तम पोचगे (रा. अमरावती) यांनी मुलगी माधुरी हरविल्याबाबत गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यानंतर आरोपी पोलीस कर्मचारी अमित सोमेश्वर अकाशे आणि मोहित अकाशे यांनी गर्भवती माधुरीचे अपहरण करून तिला डांबून ठेवल्याचा आरोप पोचगे
यांनी केला होता. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना शनिवारी अटक केली. त्यांना २५ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीतील चौकशीदरम्यान आरोपींनी मुलीच्या हत्येची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर सुलतानपुरा परिसरातील भांडेगोंडे शिवारात ज्या विहिरीत आरोपींनी माधुरीचा मृतदेह जाळून टाकला होता. तेथे खोदकाम करून पोलिसांनी रविवारी राखेचे काही नमुने ताब्यात घेतले. माधुरीच्या वडिलांनी मुलगी हरविल्याची तक्रार केल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली होती. गेल्या नऊ महिन्यांपासून पोलीस विविध पद्धतीने चौकशी करीत होते.

विहिरीत चिता रचून मृतदेह जाळला
९ एप्रिल २०१७ रोजी अमित, त्याचा भाऊ मोहित व माधुरी हे तिघेही कारने अचलपूरला जाण्यासाठी निघाले. गर्भवती असल्यामुळे माधुरी लग्नाचा तगादा लावत होती, तर पैसे घेऊन बाजूला होण्यासाठी अमित तिच्यावर दबाव टाकत होता. यातून रात्री ८ ते ९च्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. त्यात अमितने तिची गळा आवळून हत्या केली आणि भांडेगोंडे शिवारातील विहिरीत तिचा मृतदेह टाकला. दुसऱ्या दिवशी अमित व मोहित यांनी तेथे येऊन विहिरीत चिता रचून मृतदेह जाळून टाकला आणि ११ जुलै रोजी दोघांनी राख गोळा करून बैतुल येथील एका नदीत टाकली.

Web Title: Disposal of the pregnancy burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा