पोलिसांच्या बक्षिसात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:57 PM2017-12-19T22:57:06+5:302017-12-19T22:57:23+5:30

Deselect the police prize | पोलिसांच्या बक्षिसात दिरंगाई

पोलिसांच्या बक्षिसात दिरंगाई

Next
ठळक मुद्देचार कोटी मंजूर : राज्य शासनाचा निर्णय, अमरावती आयुक्त कार्यालयाला सर्वांत कमी निधी

चेतन घोगरे ।
आॅनलाईन लोकमत
अंजनगाव सुर्जी : सण-उत्सव तसेच आपत्कालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना पाच कोटींपैकी चार कोटींची बक्षिसे त्वरित वाटप करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या आदेशावरून कार्यवाहीला अद्याप गती मिळालेली नाही.
राज्यात २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०१७ या कालावधीत सण-उत्सव होते. आॅगस्ट महिन्यात मुंबई व परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी पोलिसांनी वित्तहानी व जीवहानी होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. या कामगिरीकरिता पाच कोटी रुपये बक्षीस वितरीत करण्यास राज्याच्या गृहविभागाने मान्यता दिली होती. या अनुषंगाने पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य राखीव पोलीस बल गट १ ते १६ यांना उपलेखाशीर्ष बक्षीस उद्दिष्टाखाली म्हणून चार कोटी रुपये बीडीएस प्रणालीवर उपलब्ध केले.
रकमेचे वाटप केव्हा ?
गृह विभागाने चार कोटी रुपये मंजूर केले तसेच अपर पोलीस महासंचालकांनी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना ही बक्षीस स्वरूपाची रक्कम दोन महिन्यांपूर्वी त्वरित उपलब्ध करून दिली. तरीही रक्कम वाटपात पोलीस विभागाकडूनच दिरंगाई होताना दिसून येत आहे.
मुंबई आयुक्तालयास सर्वाधिक निधी
अमरावती आयुक्त कार्यालयाला सर्वात कमी ५,२१,३१७ रुपये निधी, तर पुणे आयुक्त कार्यालयाला सर्वाधिक २,७५,०४,७३१ रुपये निधी प्राप्त झाला. गट क्र.८ मुंबईला सर्वाधिक ३,३१,०८४, तर गट क्र.१६ कोल्हापूरला २,०३,१४० रुपये निधी प्राप्त झाला.
पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्रनिहाय निधीवाटप
ठाणे परिक्षेत्र २,८२,५,१५७
नाशिक परिक्षेत्र ३,६७,१,९४६
कोल्हापुर परिक्षेत्र ३,९६,५,७१३
औरंगाबाद परिक्षेत्र २,१५,२,६०७
अमरावती परिक्षेत्र ३,३०,०,५१०
नांदेड परिक्षेत्र २,३१,०,५७३
नागपूर परिक्षेत्र ४,४३,७,६४८
(सर्व आकडे रुपयांत)

Web Title: Deselect the police prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.