लोकवर्गणीतून शहानूर नदीचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:45 AM2019-06-14T01:45:04+5:302019-06-14T01:45:55+5:30

तालुक्याची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या शहानूर नदीचे पात्र अत्यल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडले आहे. अतिक्रमणाने पात्र संकुचित झाले आहे. कधी नव्हे तो यंदा तालुक्याला कोरड्या दुष्काळाचा फटका बसला. शहानूर कोरडीठण्ण झाली.

Depth of Shahnur River | लोकवर्गणीतून शहानूर नदीचे खोलीकरण

लोकवर्गणीतून शहानूर नदीचे खोलीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनव उपक्रम : पात्र वाढणार, तीन किलोमीटरपर्यंत काम

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : तालुक्याची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या शहानूर नदीचे पात्र अत्यल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडले आहे. अतिक्रमणाने पात्र संकुचित झाले आहे. कधी नव्हे तो यंदा तालुक्याला कोरड्या दुष्काळाचा फटका बसला. शहानूर कोरडीठण्ण झाली. काळाची पावले ओळखून अंजनगाव सुर्जीकरांनी शहानूरचे पात्र खोल व रुंद करण्याचा वसा घेतला आहे. लोकसहभागातून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत खोलीकरण होणार आहे.
तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यात नदी-नाले तुडुंब भरून वाहिलेच नाहीत. विहिरी, बोअर आटल्या. त्यामुळे जलसंवर्धन व जलसंधारणाची निकड प्रकर्षाने जाणवू लागली. त्याबाबत पावसाचे पाणी भूगर्भात कसे मुरवता येईल, यासाठी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष, सर्वपक्षीय नगरसेवक, लोकजागर संस्था व शहरातील नागरिक सहभागी झाले. त्यात लोकवर्गणी करून शहानूर नदीपात्राचे खोलीकरण करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. आतापर्यंत अडीच ते लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली आहे. त्यातून एकाच वेळी लोकसहभाग व जेसीबी लावून खोलीकरण करण्यात येणार आहे.
बैठकीस नगराध्यक्ष कमलकांत लाडोले, दिलीप भोपले, नितीन पटेल, एम.आर. पाटील, लोकजागरचे बंडू हंतोडकर, आनंद संगाई, शरद बलंगे, मनोहर मुरकुटे, दिनेश भोंडे, रमेश पटेल, योगेश नेमाडे, संजय येऊल, सुंदरलाल पटेल, गणेश गुजर, वासुदेव बोडखे, मधुकर गुजर, मनोहर भावे, कृष्णा गोमांसे, सचिन जायदे, नंदकिशोर अवंडकर, भूपेंद्र भेलोंडे, नीलेश इखर, देवानंद माकोडे, संजय धरस्कार, रवींद्र बोडखे, सुभाष थोरात, अविनाश पवार, सतीश वानखडे, वासुदेव दुधे, घनश्याम हजारे, संजय धरस्कार, संतोष गोलाईत, कमलेश पटेल, गजानन रेखाते, गजानन हुरपडे, प्रवीण नेमाडे, रघुनाथ राऊत व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Depth of Shahnur River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी