बोंडअळीग्रस्तांना नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:23 AM2018-03-02T01:23:37+5:302018-03-02T01:23:37+5:30

तालुक्यात बीटी कपाशीवरील बोंडअळीने प्रचंड नुकसान झाले. याची शासनस्तरावर नोंद असावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने तहसील कार्यालयात तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांची.....

Compensate the moneylenders | बोंडअळीग्रस्तांना नुकसानभरपाई द्या

बोंडअळीग्रस्तांना नुकसानभरपाई द्या

Next
ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडची मागणी : एसडीओंना निवेदन, आंदोलनाचा इशारा

ऑनलाईन लोकमत
दर्यापूर : तालुक्यात बीटी कपाशीवरील बोंडअळीने प्रचंड नुकसान झाले. याची शासनस्तरावर नोंद असावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने तहसील कार्यालयात तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार व जीएचआय फार्म भरण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीची मदत मिळण्यासाठी ही नोंद घेण्यात आली होती.
यंदाच्या खरिपात तालुक्यात २६ हजार ९३६ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झाली होती. यातील ४,१०५ क्षेत्रात बोंडअळी व किडींचा अटॅक झाल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली. त्यामुळे ५० क्षेत्रात नुकसान झाले. कृषी विभागाकडे जीएचआय प्रपत्र भरूनसुद्धा दर्यापूर तालुका बोंडअळीच्या अनुदानातून का बगळण्यात आले, असा प्रश्न संभाजी ब्रिगेडच्यावतीने गुरुवारी उपभिागीय कार्यालयात सभांजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक अभय गावंडे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी केला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्यास आत्मदहण करण्याचा इशारा निवेदनातून दिला. यावेळी तालुकाध्यक्ष विकास कुलट, अरविंद घाटे, कार्याध्यक्ष नमित हुतके, उपाध्यक्ष नितीन गावंडे, संघटक मंगेश बोळखे, शहराध्यक्ष सुशांत गावंडे, वैभव ठाकरे, भूषण वाकोडे, गणेश कराडे, फैजल अकबानी, अनिकेत काटोडे, प्रज्ज्वल शेळके उपस्थित होते.

Web Title: Compensate the moneylenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.