वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी चिरोडी, पोहरा वनविभागाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:28 AM2019-03-31T01:28:11+5:302019-03-31T01:28:58+5:30

उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्या अनुषंगाने चांदूर रेल्वे आणि वडाळी या दोन्ही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलात वनविभागाने चार पाणवठे तयार केले. बिबट्यासह वन्यप्राणी वनक्षेत्राबाहेर जाऊ नये, यासाठी ही व्यवस्था आहे.

 Chirodi, fodder forest section to meet the hunger of wildlife | वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी चिरोडी, पोहरा वनविभागाची धडपड

वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी चिरोडी, पोहरा वनविभागाची धडपड

Next
ठळक मुद्देजंगलातील पाणवठा : टँकरद्वारे होते पाणीपुरवठा

अमोल कोहळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्या अनुषंगाने चांदूर रेल्वे आणि वडाळी या दोन्ही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलात वनविभागाने चार पाणवठे तयार केले. बिबट्यासह वन्यप्राणी वनक्षेत्राबाहेर जाऊ नये, यासाठी ही व्यवस्था आहे.
दऱ्याखोऱ्यांमुळे दुर्गम असलेल्या वरूडा वनक्षेत्रात टँकरने दरदिवसाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पोहरा आणि चिरोडी वनक्षेत्रात नैसर्गिक पाणवठे १० च्या जवळपास आहेत. त्यातच चार कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. चिरोडी-पोहºयाचे जंगल दºयाखोºयाचे आहे. यामुळे पाणवठ्यांमध्ये भर उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणवठे पोहरा-चिरोडी जंगलातील वन्यप्राण्यांची तहान भागवित आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती थांबली आहे.
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांनी आपआपल्या वनपरिक्षेत्रातील येणाºया पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी व स्वच्छतेचे निर्देश वनकर्मचाºयांना दिले आहेत.
 

Web Title:  Chirodi, fodder forest section to meet the hunger of wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.