आई-वडिलांनी रचला मुलगा पळून गेल्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:06 PM2017-12-10T23:06:22+5:302017-12-10T23:07:01+5:30

शिक्षकाने रागावल्याने आपला मुलगा घरून पळून गेला आहे, तशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. यामुळे पोलिसांनी शिक्षकावर कारवाई करावी, अशी तक्रार अचलपूर ठाण्यात दाखल झाली.

The boy ran away from the boy | आई-वडिलांनी रचला मुलगा पळून गेल्याचा डाव

आई-वडिलांनी रचला मुलगा पळून गेल्याचा डाव

Next
ठळक मुद्देपालकासह शिक्षकावर गुन्हे दाखल

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : शिक्षकाने रागावल्याने आपला मुलगा घरून पळून गेला आहे, तशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. यामुळे पोलिसांनी शिक्षकावर कारवाई करावी, अशी तक्रार अचलपूर ठाण्यात दाखल झाली. मात्र तीन तासांतच मुलगा पळाला नसून आई-वडिलांनीच हा डाव आखल्याचे लक्षात येताच हे प्रकरण पालकांच्या आंगलट आले. ही घटना शनिवारी उघडकीस आली.
डोके सुन्न करणारी ही घटना अचलपूर शहरातील चावलमंडी परिसरातील आहे. आपला मुलगा शाळेतील शिक्षकाने रागावल्यामुळे घरून निघून गेल्याची फिर्याद शारदा संजय शर्मा (४०) यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता दिली. तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा प्रेम (१४) येथील राष्ट्रीय शाळेत इयत्ता नववीत आहे. त्यास शिक्षक चेतन शर्मा यांनी थापड लगावल्याने तो घरून निघून गेला व जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दिली आहे, असे नमूद होते.
सदर प्रकरण गंभीर असल्याचे पाहून ठाणेदार आधारसिंग सोनुने यांनी सर्व पोलीस यंत्रणा कामाला लावली. मात्र काहीच हाती लागले नाही. लगेच त्याचे मित्राकडे शोधमोहीम चालविली. यातच प्रेम त्याच्या मावशीकडे मूर्तिजापूर येथे असल्याचे समजले. पोलिसांचे एक पथक मूर्तिजापूर येथे पोहोचले, रात्री ११ वाजताच्या सुमारास प्रेमला ताब्यात घेऊन अचलपुरात आणण्यात आले.
शिकवणी शिक्षकाचा सहभाग
प्रेमने पोलिसांना दिलेले बयाण संतापजनक आहे. शाळेतील शिक्षक चेतन शर्मा यांना धडा शिकविण्यासाठीच आई-वडील व शिकवणी वर्गाचे शिक्षक आशिष जोशी (रा. सुल्तानपुरा) यांनी त्यास खोटी चिठ्ठी लिहायला लावली. त्यानंतर मूर्तिजापूर येथे पाठविले. यामुळे पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला व या प्रकरणाची सत्यता समोर आली.
तक्रार अंगलट आली
प्रेमचे आई-वडील व शिकवणी वर्गाचे आशिष शर्मा यांचा डाव त्यांच्यावरच उलटला व भादंविच्या कलम १७७ अन्वये त्यांच्यावरच गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. अचलपूरचे ठाणेदार आधारसिंग सोनुने यांनी प्रकरण तडीस नेले. तपास ठाणेदारांसह जमादार विनोद राऊत, पुरुषोत्तम बावनेर, रवी बावणे, मीनाक्षी इंगोले यांनी केला.

हे प्रकरण तक्रारीच्या वेळी अतिशय गंभीर होते. शिक्षकांच्या आपसी भांडणातून पोलिसांना खोटी माहिती देण्यासाठी मुलाचा वापर केला. विनाकारण त्रास देणाºयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आधारसिंग सोनुने,
ठाणेदार, अचलपूर

Web Title: The boy ran away from the boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.