गुरुकुंजात जवानाच्या हस्ते रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:23 PM2019-02-19T22:23:02+5:302019-02-19T22:23:21+5:30

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील जवानांना गुरुकुंजात रक्तदान शिबिराद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. लढा संघटनेच्या या उपक्रमाचे उद्घाटन भारतीय सैन्यात कार्यरत श्रीकांत प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले.

Blood Donation Camp at Gurukunat Javana | गुरुकुंजात जवानाच्या हस्ते रक्तदान शिबिर

गुरुकुंजात जवानाच्या हस्ते रक्तदान शिबिर

Next
ठळक मुद्दे५१ युवकांचे रक्तदान : सामाजिक बांधिलकी जोपासत श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
गुरूकुंज मोझरी : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील जवानांना गुरुकुंजात रक्तदान शिबिराद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. लढा संघटनेच्या या उपक्रमाचे उद्घाटन भारतीय सैन्यात कार्यरत श्रीकांत प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत श्रीकांत प्रधान हे नुकतेच रजेवर गुरुकुंज मोझरीत परतले. उद्घाटन केलेल्या रक्तदान शिबिरात सर्वप्रथम त्यांनीच रक्तदान केले. श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात शिबिर पार पडले. यवतमाळ येथील महेंद्र निपुरे, मुन्ना राऊत, शेख इम्रान, इर्शाद पटेल, नीलेश राऊत, आदित्य ठाकरे, अंकुश गायकवाड, मोहन भुसारी,संदीप राठोड, नयन पाचघरे, नंदू आवारे, योगेश टाले, संदीप हगवणे, सदानंद आखरे, सुरेंद्र भिवगडे, समीर लांडगे, मोहन आवारे, संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान करण्याचे आवाहन शिबिरादरम्यान आयोजकांतर्फे करण्यात आले.

राष्ट्रसंताच्या कर्मभूमीतून, त्यांच्या भजनांतून मिळालेल्या प्रेरणने देशसेवेत दाखल झालो. अशा शिबिरांमुळे युवकांमध्ये देशभक्तीसह समाजसेवेची भावना निर्माण होईल. - श्रीकांत प्रधान

Web Title: Blood Donation Camp at Gurukunat Javana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.