सावध व्हा ! अनोळखी लिंक उघडणे पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 10:56 AM2019-06-08T10:56:24+5:302019-06-08T10:59:09+5:30

कुठल्याही अनोळखी लिंक उघडणे आपल्याला चांगलेच महागात पडू शकते, सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. नुकताच एक संदेश व्हायरल झाला असून, रजिस्टरर्ड युवर एसबीआय कार्ड ऑन अवर साईट, असे त्यावर नमूद केले आहे.

 Beware! Unknown links to be opened is may have the price | सावध व्हा ! अनोळखी लिंक उघडणे पडू शकते महागात

सावध व्हा ! अनोळखी लिंक उघडणे पडू शकते महागात

Next
ठळक मुद्देअमरावतीकरांना इशारा सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा फंडा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कुठल्याही अनोळखी लिंक उघडणे आपल्याला चांगलेच महागात पडू शकते, सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. नुकताच एक संदेश व्हायरल झाला असून, रजिस्टरर्ड युवर एसबीआय कार्ड ऑन अवर साईट, असे त्यावर नमूद केले आहे. त्यासाठी दिलेली लिंक ही फसवी असून, त्यावर आपल्या बँक खात्याची माहिती अपलोड करू नका, ती अनोळखी लिंक उघडू नका, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.
सध्या शहरातील अनेकांच्या मोबाईल क्रमांकावर एक संदेश प्राप्त होत आहे. त्यावर 'अवर रेकॉर्ड इंडिकेट दॅट यू हॅव नॉट रजिस्टरर्ड युवर एसबीआय कार्ड आॅन अवर वेबसाईट. टू स्टे अपडेट विथ यूवर ट्रान्जेक्शन, रजिस्टर नाऊ' असा तो संदेश आहे. त्याखालीच http://bit.ly/1V8wNAQ  वेबसाईडची ही लिंक दिली आहे. ती उघडल्यास तुम्हाला एसबीआय कार्डची माहिती व जन्म तारीख विचारली जाते. ती माहिती तुम्ही भरल्यास तुमच्या खात्यातील रक्कम सायबर गुन्हेगार काढू शकतात. संबंधित लिंकवर कार्डची माहिती अपलोड केल्यास वैयक्तिक माहिती संबंधितांपर्यंत पोहोचते. त्याआधारे आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे. हा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी सुरू केला असून, अनेकांच्या मोबाईल क्रमांकावर असले संदेश पाठविले जात आहेत. या फसव्या व अनोळखी लिंक उघडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सायबर ठाण्याच्या माध्यमातून दिला आहे.

Web Title:  Beware! Unknown links to be opened is may have the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.