दरोडा घालण्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:44 AM2019-06-15T00:44:24+5:302019-06-15T00:48:23+5:30

जिल्हाभर कारने फिरून दरोडा घालणारी टोळी गुरुवारी रात्री १२ वाजता तिवसा पोलिसांनी जेरबंद केली. या पाच जणांकडून नामांकित कंपन्यांचे २८ मोबाइल, एलसीडी व कार असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल तिवसा पोलिसांनी जप्त केला.

Attempted to rob the robbery | दरोडा घालण्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

दरोडा घालण्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

Next
ठळक मुद्देसातरगाव रोडवर नाकाबंदी : पाच आरोपींना अटक, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : जिल्हाभर कारने फिरून दरोडा घालणारी टोळी गुरुवारी रात्री १२ वाजता तिवसा पोलिसांनी जेरबंद केली. या पाच जणांकडून नामांकित कंपन्यांचे २८ मोबाइल, एलसीडी व कार असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल तिवसा पोलिसांनी जप्त केला. ही टोळी मोठ्या दरोड्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिनेश दिलीप भोसले (२६, रा. तिवसा), सजीनेस टेकनदास पवार (२३), विक्की दिलीप भोसले (दोघेही रा. बैलनपूर ता.जि. अमरावती), मिथून रामसिंग भोसले (३०, रा. सार्शी, ता. तिवसा, जि. अमरावती), नितेश वसंत धाडसे (२८, रा. नांद, ता. भिवापूर, जि. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते गुरुवारी रात्री एम.एच. ०२ वाय ४२३८ क्रमांकाच्या निळ्या कारने मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी मार्गे तिवस्याकडे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीने येत असल्याची गोपनीय माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे तिवसा पोलिसांनी सातरगाव रोडवरील पेट्रोल पंप चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. रात्री १२ च्या सुमारास ही कार थांबवून चौकशी सुरू केली. चालक दिनेश भोसलेसह पाचही जणांनी तिवसा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी कारची झडती घेतली. त्यात मिरचीपूड, नायलॉन दोरी, लोखंडी टॉमी, सळाखीचे लहान-मोठे तुकडे आढळून आले. गाडीच्या डिक्कीतून काळ्या रंगाच्या बॅगमध्ये विविध कंपन्यांचे २३ मोबाइल आणि आरोपींकडून पाच असे २८ मोबाइल जप्त करण्यात आले. २ लाख ५५ हजारांच्या या साहित्यासह दीड लाखांची कार असा ४ लाख ५ हजारांचा मुद्देमाल तिवसा पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर अधीक्षक श्याम घुगे, चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनात तिवस्याचे ठाणेदार अजय आकरे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे, सहायक उपनिरीक्षक संजय वाट, नायक पोलीस कॉन्स्टेबल सुनील महात्मे, प्रशांत लुंगे, मीनेश खांडेकर, दीपक सोनाळकर, शिपाई मोहसीन शाह, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकप्रमुख मनोज चौधरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर, सचिन मिश्रा, अमित वानखडे यांनी केली.

Web Title: Attempted to rob the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर