शिदोडीत वासरावर हल्ला अंजनसिंगी भागात वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:35 PM2018-10-22T22:35:01+5:302018-10-22T22:38:20+5:30

मंगरूळ दस्तगीर येथे शेतकरी आणि म्हशीची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघाने रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास शिदोडी येथे गाईच्या वासरावर हल्ला केला, तर आगेकूच करीत अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालीत दोन गाई फस्त केल्या. या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तीन ड्रोन कॉमेरे व चार पिंजरे लावले आहेत.

The attack on the slaughtered caravan was carried out in Anjansingh area | शिदोडीत वासरावर हल्ला अंजनसिंगी भागात वावर

शिदोडीत वासरावर हल्ला अंजनसिंगी भागात वावर

Next
ठळक मुद्देशाळांना दिली सुट्टीतीन पिंजऱ्यांत बांधल्या म्हशी

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : मंगरूळ दस्तगीर येथे शेतकरी आणि म्हशीची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघाने रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास शिदोडी येथे गाईच्या वासरावर हल्ला केला, तर आगेकूच करीत अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालीत दोन गाई फस्त केल्या. या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तीन ड्रोन कॉमेरे व चार पिंजरे लावले आहेत.
रविवारच्या रात्री त्या वाघाने नाकाळी जंगल सोडत रात्री शिदोडी गाव गाठले गावात खुट्याला बांधलेल्या विनोद निस्ताने यांच्या दोन वर्षाच्या जर्शी वासरावर हल्ला चढविला. वासराच्या आवाजामुळे निस्ताने यांनी बाहेरील बल्ब लावले असता वाघाने वासरावर हल्ला करून पळ काढल्याचे स्पष्टरीत्या पाहिल्याचे ते सांगतात. पशुवैधकीय अधिकारी मनोज धवणे यांनी उपचारादरम्यान बघितलेले निशाण हे वाघाच्या दाताचे असल्याचे सांगितले. पण अजूनही वन विभाग त्या वाघाला पकडण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ग्रामस्थांनी वन विभागावर ठेवला.
चिरोडी-पोहरा वर्तुळात अलर्ट जारी
पोहरा बंदी : तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या त्या नरभक्षी वाघापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी, पोहरा वर्तुळातील नागरिकांना अलर्ट राहण्याची घोषणा वनविभागातर्फे करण्यात आली आहे. या परिसराकडे तो वाघ कूच करू शकतो, अशी शक्यता वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भूंबर यांनी वर्तविली आहे.
अंजनसिंगी, कुऱ्हा परिसरात शाळेला सुट्टी
अंजनसिंगी येथील शेतकरी प्रकाश जुगलकिशोर अग्रवाल व शंकर भोयर शेतात आले असता त्यांना वाघ दिसला भीतीपोटी दोघानी मोटर सायकलने दूम ठोकली. या परिसरात पगमार्क आढळले. सकाळी ९.३० वाजता येथीलच मदर टेरेसा इंग्लिश शाळेच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न त्या वाघाने केला. मात्र, अनेकजन ओरडल्याने तो जंगल परिसरात निघून गेला. खबरदारी म्हणून एसडीओंच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी कुऱ्हा, अंजनसिंगी, दुर्गवाडा, आखतवाडा, मारडा, शिदवाडी, बोर्डा, धारवाडा, हसनापूर, मिर्चापूर, कौंडण्यपूर येथील शाळांना २३ आॅक्टोबरची सुटी जाहीर केली.
चार पिंजऱ्यांमध्ये अडकविली शिकार
मागील चार दिवसांपासून या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी तैनात केलेल्या ७० बंदूकधारी वनकर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा अंजनसिंगी- पिंपळखुटा जंगल क्षेत्राकडे वळविला. या भागात चार पिंजरे व तीन ड्रोन कॉमेरा लावण्यात आले आहे. चारही पिंजऱ्यांत म्हैस बांधल्याची माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक अशोक कविटकर व वनपाल क्षेत्राधिकारी आशिष कोकाटे यांनी दिली.

 

Web Title: The attack on the slaughtered caravan was carried out in Anjansingh area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.