धारणी शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:24 AM2019-05-12T01:24:24+5:302019-05-12T01:24:47+5:30

शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही.

Artificial water shortage in the catchment area | धारणी शहरात कृत्रिम पाणीटंचाई

धारणी शहरात कृत्रिम पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देतीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त। पाणीपातळी खोल, उपशावर मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही. उपाययोजना सूचविल्या गेल्या; मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांची परवड होत आहे.
नगरपंचायत व तालुका प्रशासनानुसार, शहर परिसरातील भूगर्भात मुबलक पाणी आहे. स्थानिक नगरपंचायतने शहरवासीयांसाठी १७ प्रभागांत १७ बोअरवेल केल्या. मात्र, तूर्तास तीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त झाल्याने तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५ हजार आहे. ती आता २५ हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. बोअरवेलच्या माध्यमातून होणाºया पाणीपुरवठ्यासाठी १८०० नागरिकांना नळ जोडणी देण्यात आली आहे. यंदा सर्वच भागात पाण्याची पातळी खोलवर गेल्याने बोअरच्या दैनंदिन उपशास मर्यादा आल्या आहेत. इलेक्ट्रिक मोटर बोअरवेलमध्ये खाली सोडाव्या लागत आहेत. पाणीपातळी खोल गेल्याने जुन्या मोटर अधिक दाबाने पाणी खेचू शकत नाही. तेथे नवीन मोटर लावण्याची गरज आहे. मात्र, त्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. नळ आणि टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाणीपट्टी कर नियमित भरत असताना आमच्याच नशिबी पाणीटंचाई का, असा संतप्त सवाल धारणीकर विचारू लागले आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे प्रस्तावांना मान्यता मिळाली नाही, असे ठेवणीतील उत्तर नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना दिले जात आहे.

नगरपंचायत प्रशासनाकडून नियोजन कागदोपत्री
नगरपंचायत प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईसंदर्भातील नियोजन कागदोपत्री केले. पाणीटंचाई निवारणार्थ १४ लाखांची तरतूद करण्यात आली. मात्र, मे महिना संपत असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे पंचायतीचे नियोजन बारगळले आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे.
तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १४ लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने त्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. मान्यता मिळाल्यास नवीन मोटर खरेदी केल्या जातील.
- सूर्यकांत पिदूरकर,
मुख्याधिकारी, धारणी
 

Web Title: Artificial water shortage in the catchment area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.