मनपसंत ‘चॉइस नंबर’ साठी राज्यातील हौशींनी मोजले तब्बल ७७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:58 PM2017-11-22T14:58:55+5:302017-11-22T15:00:08+5:30

वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे.

Approximate 77 crores for the favorite 'Choice Number' | मनपसंत ‘चॉइस नंबर’ साठी राज्यातील हौशींनी मोजले तब्बल ७७ कोटी

मनपसंत ‘चॉइस नंबर’ साठी राज्यातील हौशींनी मोजले तब्बल ७७ कोटी

googlenewsNext
ठळक मुद्दे९९ हजार वाहनधारकांनी मिळविला चॉइस नंबरपुण्यात सर्वाधिक हौशी गाडीधारक

प्रदीप भाकरे
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत. त्यातील १७ जणांनी तर अडीच लाख रुपये किंमत असलेले क्रमांक ७१ लाखांना मिळविले. २३.४५ कोटी रुपये महसूल मिळवून पुणे विभाग यामध्ये अव्वल ठरला आहे.
वाहनधारकांच्या विशिष्ट क्रमांकावर पडणाऱ्या उड्या लक्षात घेऊन आरटीओनेही त्यातून महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले. हौशी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्याअनुषंगाने आरटीओने ०१ व ९९९९ या क्रमांकासह ०७८६, १११, ४४४, ५५५ असे विविध चॉइस नंबर उपलब्ध केले. ०००१ या क्रमांकासाठी तर अडीच ते तीन लाख रुपये आकारणी केली जाते. पाच हजारापासून ते अडीच लाख रुपयांच्या पुढे हे क्रमांक उपलब्ध आहेत. आरटीओने ही नोंदणी आॅनलाइनदेखील केली आहे. एप्रिल ते ३० आॅक्टोबर २०१७ या कालावधीत पसंतीच्या वाहनक्रमांकातून आरटीओच्या १२ विभागीय कार्यालयांना ७७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. राज्यातील ९९ हजार वाहनधारकांनी पसंतीचे क्रमांक मिळविले.

६७ हजार वाहनधारक पाच हजारी
राज्यातील ६७,६५७ वाहनधारकांनी प्रत्येकी पाच हजार रुपये भरून पसंतीचे क्रमांक मिळविले. त्यातून आरटीओला २८.५३ कोटी रुपये महसूल मिळविले. १६,९१० वाहनधारकांनी ५ ते ७ हजार रुपये किंमत असलेले पसंती क्रमांक मिळविलेत. ७५०१ ते १० हजार रुपये किंमत असलेले क्रमांक मिळवून १६०२ वाहनधारकांनी आरटीओच्या तिजोरीत १.६० कोटींची भर घातली. १० ते २० हजार किमतीचे क्रमांक ६१३३ वाहनधारकांनी मिळविले. त्यातून आरटीओला ८.८६ कोटी रुपये प्राप्त झालेत. २० ते ५० हजार रुपये प्रत्येकी भरून ६,०३२ वाहनधारकांनी, तर ५० हजार ते एक लाख रुपये किमतीचे क्रमांक मिळवून २६७ जणांनी १.९१ कोटी रुपये खर्च केलेत. ३११ वाहनधारकांनी १ लाख ते अडीच लाख रुपये किमतीचे पसंतीचे क्रमांक मिळविलेत. त्यातून आरटीओला ४.९२ कोटींचा महसूल मिळाला.

विभागनिहाय मिळालेला महसूल (कोटीत)
विभाग प्रकरणे                  महसूल
बृहन्मुंबई                          ६६५२ ६.०८
ठाणे                                  १०७४४ ९.९८
पनवेल                              ३८०१ २.७१
कोल्हापूर                          १०६११ ७.३०
पुणे                                   ३०३६६ २३.४५
नाशिक                            २७५४५ १९.५९
धुळे                                  ८३७ ०.५८
औरंगाबाद                        ३५७२ २.८०
लातूर                               ३१० ०.३०
नांदेड                                १२८१ १.०६
अमरावती                          १२९७ १.०७
नागपूर                               १५६२ १.१३

Web Title: Approximate 77 crores for the favorite 'Choice Number'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.