जैव तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:55 AM2019-06-13T01:55:19+5:302019-06-13T01:55:43+5:30

निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे बिघडलेले अर्थकारण सुधारण्यासाठी जैव तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, हिंगोली कृषी विज्ञान केंद्र आणि दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बायोटेक किसान हब प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.

Apply biotechnology | जैव तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

जैव तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

Next
ठळक मुद्देशैलेश नवाल : केव्हीके दुर्गापूर येथे बायोटेक किसान हब

बडनेरा : निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे बिघडलेले अर्थकारण सुधारण्यासाठी जैव तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, हिंगोली कृषी विज्ञान केंद्र आणि दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बायोटेक किसान हब प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रमसाधना अमरावती ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त रावसाहेब शेखावत होते. प्रमुख अतिथी म्हणून माफसूचे माजी कुलगुरू व नवी दिल्ली स्थित जैवतंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. अरुण निनावे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डी.एम. मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, टीसँगोच्या ममता मून, दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख के.ए. धापके आदी मान्यवर उपस्थित होते.
बायोटेक किसान हब प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचेही रावसाहेब शेखावत म्हणाले. कार्यक्रमात कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत समाधान बंगाळे, तर गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनावर अक्षयकुमार सुगाव तसेच कपाशी लागवड तंत्रज्ञान या विषयावर राजेश भालेराव यांनी उपस्थित शेतकºयांना तांत्रिक मार्गदर्शन केले. शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे कृषिमित्र संजय यावले (रा. टाकळी), सुमीत मेंढे (रा. टिमटाला), गोपाल रोकडे (रा. निरूळ गंगामाई), मनीषा टवलारे (रा. दाभा), मुकुंद कोळमकर (रा. उमरी) यांचा मोबाइल टॅब देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Apply biotechnology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.