अनिल बोंडे 'सोफिया'चे दलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:26 PM2019-01-18T23:26:22+5:302019-01-18T23:27:15+5:30

आ. अनिल बोंडे हे स्वत: सोफिया वीज प्रकल्पाचे दलाल आहेत. चोरी, दलाली हा त्यांचा मूळ पेशा आहे. त्यांनीच वारंवार ग्रामस्थांची फसवणूक केली, असा आरोप करीत युवक काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाकचेरीवर बोंडेंच्या पोस्टरला चपलांनी बदडून नंतर जाळला. त्यामुळे खोपडा भूसंपादनप्रकरणी भाजप- काँग्रेस आमने - सामने आले आहे.

Anil Bonde 'Sofia' Brokers | अनिल बोंडे 'सोफिया'चे दलाल

अनिल बोंडे 'सोफिया'चे दलाल

Next
ठळक मुद्देयुवक काँग्रेसचे जिल्हाकचेरीवर आंदोलन : पोस्टरला चपलांनी बदडून जाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आ. अनिल बोंडे हे स्वत: सोफिया वीज प्रकल्पाचे दलाल आहेत. चोरी, दलाली हा त्यांचा मूळ पेशा आहे. त्यांनीच वारंवार ग्रामस्थांची फसवणूक केली, असा आरोप करीत युवक काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाकचेरीवर बोंडेंच्या पोस्टरला चपलांनी बदडून नंतर जाळला. त्यामुळे खोपडा भूसंपादनप्रकरणी भाजप- काँग्रेस आमने - सामने आले आहे.
खोपडा पुनर्वसित भूसंपादन प्रकरणी आमदार यशोमती ठाकूर यांनी बुधवारी उपजिल्हाधिकारी अजय लहाने यांनी अपहार केल्याचा आरोप केल्यानंतर आमदार अनिल बोंडे यांनी याप्रकरणी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आ. यशोमती ठाकूर यांनी दलाली घेतल्याचा प्रत्यारोप केला. त्यामुळे खोपडा भूसंपादन प्रकरणी आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. यातूनच शुक्रवारी युवक काँग्रेस आक्रमक झाली. आ. अनिल बोंडे हे दलाल असल्याचा आरोप करीत जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. दरम्यान आ.बोंडे यांच्या पोस्टरला चपलांनी बदडले व नंतर पोस्टर जाळून युवक काँग्रेसने संताप व्यक्त केला.
दरम्यान, युवक काँग्रेसने ‘देश का चौकीदार चोर है, वरूड मोर्शीचा आमदार चोर है’, असा आरोप करीत बोंडे यांनी एका महिला आमदाराबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. बोंडे यांच्या पोस्टरला चपलांनी बदडले. कार्यकत्यांनी पोस्टर पेटवून संताप व्यक्त केला.
यावेळी युवक काँग्रेसचे तिवसा विधानसभा अध्यक्ष रितेश पांडव, प्रदेश महासचिव सागर देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सागर कलाने, सागर यादव, सौरभ किरकटे, अंकुश जुनघरे, संजय चौधरी, प्रशांत वानखडे, मनोज इंगोले, तन्मय मोहोड, विवेक हरणे, मुकेश लालवाणी, हरीष मोरे, पंकज देशमुख, लुकेश केने, विक्रम राऊत आदीचा सहभाग होता.
प्रकल्पाच्या आवारात अ‍ॅशब्रिक्स फॅक्टरी
आ.अनिल बोंडे हे पेशाने डॉक्टर असले तरी रूग्णांना बरे करण्यासाठी शासकीय दलाली खातात. सोफिया प्रकल्पाविरुद्ध आक्रोश दाखवित आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी दलाली खाल्ली. याचा पुरावा म्हणजे याच प्रकल्पाच्या आवारात अ‍ॅशब्रिक्स फॅक्टरी आहे. टोल नाका, संत्रा परिषदेच्या नावे अनुदान लाटणे, जलयुक्त शिवार योजनेत भागिदारी, तीन पालिकांचा टॅक्स वाढविल्याने आ. बोंडे हेच दलाल आहे, असा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदना केला.

आ. यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करणारे वरूड- मोर्शीचे आ. अनिल बोंडे हे दलाल आहेत. त्यांनी अनेक योजना व प्रकल्पात दलाली खाल्ली आहे. स्वत: काहीच न करता भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण करणाऱ्यांनी यापुढे अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करू नये, अन्यथा युवक काँग्रेस आपल्या पद्धतीने धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
- रितेश पांडव, अध्यक्ष, तिवसा विधानसभा

खोपडा येथील नागरिकांना न्याय मिळून द्यावा, यासाठी येथील नागरिकांनी आ. यशोमती ठाकूर यांना साकडे घातले. त्यानुसार अन्यायग्रस्त नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. परंतु, आ. बोंडे यांनी स्वत: काहीच न करता महिला आमदारांबद्दल बेताल वक्तव्य केले. आ. बोंडे हेच दलाल आहेत. शासकीय योजनेतून त्यांनी मलिदा लाटल्याचे सर्वश्रृत आहे.
- सागर कलाने, जिल्हा उपाध्यक्ष, युवक काँग्रेस

जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठविणाऱ्या विदर्भातील एकमेव महिला आ. यशोमती ठाकूर आहेत. मात्र, त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आमदारांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आ. अनिल बोंडेंचा जाहीर निषेध. बोंडेंनी मर्यादा ओलांडल्या तर युवक काँग्रेस त्यांना धडा शिकवेल.
- हरीश मोरे, पदाधिकारी, युवक काँग्रेस

Web Title: Anil Bonde 'Sofia' Brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.