आठ गावात दहशत; नरभक्षक वाघाचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:11 AM2018-10-21T01:11:10+5:302018-10-21T01:11:43+5:30

शेतात चारा आणण्यास गेलेल्या एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याने परिसरातील गावांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली आहे़ दात व पंजाने ८१ वेळा मारा करून वाघाने शेतकऱ्याला ठार केले. सदर शेतकऱ्याचा उजवा हात व मानेचा मागचा भाग फस्त केला.

8 villages panic; The search for cannibal tigers started | आठ गावात दहशत; नरभक्षक वाघाचा शोध सुरू

आठ गावात दहशत; नरभक्षक वाघाचा शोध सुरू

Next
ठळक मुद्दे८१ वेळा दात, पंजाने मारा करून घेतला बळी : उजवा हात, मानेचा भाग बेपत्ता; वनविभागाचे कोम्बिंग आॅपरेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : शेतात चारा आणण्यास गेलेल्या एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याने परिसरातील गावांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली आहे़ दात व पंजाने ८१ वेळा मारा करून वाघाने शेतकऱ्याला ठार केले. सदर शेतकऱ्याचा उजवा हात व मानेचा मागचा भाग फस्त केला. त्या नरभक्षक वाघाचा शोध वनविभाग कोम्बिंग आॅपरेशनद्वारे घेत आहे़
तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र देविदास निमकर (४८) हे शुक्रवारी दुपारी ४ वाजता शेतात सायकलने गेले असता, रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत. शोध घेतल्यावर वाघाने ठार केल्याची बाब पुढे आली. तालुक्यातील ही पहिली घटना आहे़ शुक्रवारी रात्री राजेंद्रचे शीर वनविभागाला मिळाले. मात्र, शरीर मिळाले नव्हते़ रात्री दीडपर्यंत वनविभागाने ३१ शीघ्र पथक कर्मचाऱ्यांच्यावतीने कोम्बिग आॅपरेशन राबविले़ पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या या शोधमोहिमेत काही अंतरावर राजेंद्रचे अर्धे शरीर मिळाले़
डीएनए पाठविणार सीसीएमबीकडे
मृत शेतकरी राजेंद्र निमकर यांच्या शरीरावर वाघाच्या दात व पंजाचे ८१ घाव असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अंदाजात स्पष्ट झाले़ ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे व डॉ़आशिष सालणकर यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून जिल्हा शल्यचिकित्सकाकडे अहवाल पाठविला. उजवा हात, डोक्याकडील मानेचा मागचा भाग बेपत्ता असल्याने उर्वरित शरीराचे शवविच्छेदन करून नातेवाइक ांच्या सुपूर्द करण्यात आले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेले डी़एऩए हैद्राबाद येथे सीसीएमबीकडे तपासण्यासाठी पाठविण्यात येणार आहे़
विष्ठेमुळे होणार ओळख
वनविभागाच्यावतीने सुरू असलेल्या शोधमोहिमेत सदर वाघाचे पगमार्क व विष्ठा मिळाली आहे़ त्यावरून वाघ किंवा वाघीण हे ओळखता येणार आहे़ मृत राजेंद्र निमकर यांच्या शरीरावर मिळालेल्या वाघाच्या केसाचे नमुने हैद्राबाद येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले असून, तीन शोध पथके या भागात कार्यान्वित असल्याची माहिती उपवनसरंक्षक हरिचंद्र वाघमोडे व वनक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दिली़
वीरेंद्र जगताप यांची घटनास्थळी भेट
शेती करून संसाराचा गाडा चालविणारे शेतकरी राजेंद्र निमकर यांचा बळी गेल्याने मंगरूळ दस्तगीर परिसरातील नागरिक वाघाच्या दहशतीत आहे़त. आ़ वीरेंद्र जगताप यांनी रात्रीला घटनास्थळी भेट दिली. वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली़ ग्रामस्थांनी कोणतीही भीती मनात बाळगू नये, मात्र सतर्कता बाळगण्याचे आवाहन आ़ अरुण अडसड यांनी केले़
रात्री शेतात जायचे कसे?
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भागातून वर्धा नदीकाठाने अमरावती जिल्ह्यात दाखल झालेल्या या वाघाच्या पंजाचे निशाण प्रथमत: गिरोली शिवारात मिळाले होते़ दिघी खानापूर या भागातील नाकाडा जंगल हे काही प्रमाणात दाट असल्याने वन्यप्राण्यांना लपण्यासाठी सोईची जागा आहे़ वर्धा नदीकाठावरील झाडा, आष्टा, गोकुळसरा, दिघी महल्ले, सोनोरा काकडे, वरूड बगाजी, चिंचोली, येरली, शिदोडी या भागात वाघाची दहशत निर्माण झाली आहे़ दरम्यान, अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने रात्री शेतात जायचे कसे, असा सवाल शेतकºयांनी वनविभागाला निर्माण केला आहे़

Web Title: 8 villages panic; The search for cannibal tigers started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ