१७ दिवसांत ५१३ डेंग्यू संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:11 AM2018-08-20T01:11:32+5:302018-08-20T01:11:56+5:30

शहरात डेंग्यू व अन्य साथरोगांची लागण झपाट्याने होत असून, उपचारासाठी दाखल रुग्णांनी खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. १७ दिवसांत ५१३ रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळली आहेत. त्यांचे रक्तजलनमुने शासकीय प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले आहेत.

513 suspected dengue in 17 days | १७ दिवसांत ५१३ डेंग्यू संशयित

१७ दिवसांत ५१३ डेंग्यू संशयित

Next
ठळक मुद्देफिव्हर : खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात डेंग्यू व अन्य साथरोगांची लागण झपाट्याने होत असून, उपचारासाठी दाखल रुग्णांनी खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. १७ दिवसांत ५१३ रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळली आहेत. त्यांचे रक्तजलनमुने शासकीय प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले आहेत.
डेंग्यू हा नोटीफाईड आजार असल्याने डॉक्टरांकडून त्याबाबतची माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेला दिली जाते. त्या पार्श्वभूमिवर विविध डॉक्टरांनी दाखल डेंग्यू संशयित रुग्णांची माहिती महापालिकेला दिल्यानंतर त्या ५१३ रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित करून जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत परीक्षणासाठी पाठविले आहेत.
त्याबाबतचा अहवाल आरोग्य यंत्रणेला अप्राप्त असला तरी दोन महिन्यांतील डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता ही साथ अद्यापही आटोक्यात आलेली नाही, हे वास्तव आहे.
जुलै महिन्यात एकूण २७५ रुग्णांचे रक्तजलनमुने संकलित करून ते परीक्षणासाठी पाठविण्यात आले होते. आॅगस्टच्या या १७ दिवसांतच ती संख्या ५१३ वर पोहोचल्याने अमरावतीकरांमध्ये डेंग्यूची दहशत पसरली आहे.
या भागात आहे डेंग्यूचे थैमान
शांतीनगर, यशोदानगर, मुदलीयार नगर, महावीरनगर, रविकिरण कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अंबिकानगर, कृष्णार्पण कॉलनी, अंबा कॉलनी, कुंभारवाडा, गोपालनगर, कल्याणनगर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, गणेशनगर, विसावा कॉलनी, शंकरनगर, कमल कॉलनी, नवाथे, महालक्ष्मीनगर, भाजीबाजार, रविकिरण कॉलनी, जनार्दनपेठ, लक्ष्मीविहार, गायत्रीनगर, मच्छीसाथ, चैतन्य कॉलनी, जयंत कॉलनी, पार्वतीनगर, पूजा कॉलनी, पुंडलिकबाबा कॉलनी, बाकडेवाडी, रेणुकाविहार, तिरुपतीनगर, एकनाथ विहार, कंवरनगर, विमलनगर, चिमोटे ले-आऊट, छाया कॉलनी, महेंद्र कॉलनी, दस्तुरनगर, उत्तमनगर, शांतीनगर, हिंगासपुरी नगर, पोस्टमन कॉलनी, हर्षराज कॉलनी, गाडगेनगर, छांगाणीनगर, जया कॉलनी, गोपालनगर, शारदा नगर, विहार, क्रांती कॉलनी, किरणनगर, पुष्पक कॉलनी, प्रवीणनगर, अर्जुननगर, गजानननगर, मधुबन कॉलनी, मांगिलाल प्लॉट, अंबागेट, श्रीविकास कॉलनी, परमार लेआऊट, पार्वतीनगर भागात आहेत.

Web Title: 513 suspected dengue in 17 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.