२१ हजार हेक्टर संत्राबागा ‘सलाईन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:29 PM2019-01-16T22:29:05+5:302019-01-16T22:30:22+5:30

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे २० हजार ६०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा दुष्काळाच्या तडाख्यात सापडल्या आहेत.

21 thousand hectares of sandalaganga 'saline' | २१ हजार हेक्टर संत्राबागा ‘सलाईन’वर

२१ हजार हेक्टर संत्राबागा ‘सलाईन’वर

googlenewsNext
ठळक मुद्देविहिरींनी गाठले तळ : भूजल जलपातळीत कमालीची घसरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे २० हजार ६०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा दुष्काळाच्या तडाख्यात सापडल्या आहेत.
तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली आहे. गहू, चणा, मका, मिरची, पालेभाज्या आदी बागायती पिके घेतली जातात. तथापि, तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्पांमध्ये यंदा ५ ते १५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. जानेवारीमध्ये तोही आटण्याची चिन्हे आहेत. बोअरचे पाणी ७०० ते ८०० फुटांवर खोल गेले आहे. तसेच विहिरींची जलपातळी ६० ते ७० फुटांवर खोल गेली आहे. दिवसभर पाण्याचा उपसा करूनही न आटणाऱ्या विहिरी आता अर्ध्या तासांतच आटू लागल्या आहेत. काही विहिरी आचके देत आहेत. त्यामुळे संत्रा जगविण्याचा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. पाण्याबाबत पर्याय नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता वाढली आहे.
नर्सरीधारकांपुढेही पेच
तालुक्यात ४०० पेक्षा अधिक संत्रा कलमा तयार करणारे नर्सरीधारक शेतकरीच आहेत. यावर्षीसुद्धा कोट्यवधी कलमांची निर्मिती करण्यात आली आहे. तथापि, पाण्याअभावी मृग बहर संत्राउत्पादकांकडून तोडला जात असताना, या कलमांना बाजारपेठ उपलब्ध आहे का, असा प्रश्न नर्सरीधारकांचा आहे.
बोअरची परवानगी द्या
येणाऱ्या काळात लाखो संत्राझाडे आणि कोट्यवधी कलमा पाण्याअभावी संपतील. भूजल पातळीत कमालीची घसरण झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. त्यामुळे अधिकाºयांनी शेतकऱ्यांना बोअरवेल करू द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: 21 thousand hectares of sandalaganga 'saline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.