१५ वनाधिकाऱ्यांची परदेशवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:36 PM2018-11-18T17:36:25+5:302018-11-18T17:37:11+5:30

केंद्र सरकारचा पुढाकार : मलेशियात वन्यजीव व्यवस्थापनावर धडे घेणार 

15 forest officials going to Foreign tour | १५ वनाधिकाऱ्यांची परदेशवारी

१५ वनाधिकाऱ्यांची परदेशवारी

Next

अमरावती : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याच्या पुढाकाराने मलेशिया येथे १० ते २२ डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या वन्यजीव व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेसाठी देशातील १५ वनाधिकाºयांची वर्णी लागली आहे. यात त्रिपुरा, केरळ, ओडिशा, महाराष्ट्र, अंदमान व निकोबार, नागालँड, दिल्ली आणि कर्नाटक राज्यातील वनाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 


 वन्यजीवाशी निगडित कर्तव्य बजावणाºया वनाधिकाºयांची मलेशिया येथे वन्यजीव व्यवस्थापन कार्यशाळेकरिता निवड करण्यात आली आहे. रवींद्र कुमार सेमल (त्रिपुरा), नरेंद्रनाथ वेलुरी (कर्नाटक), खुशवंत सिंह (ओडिशा), प्रमोद चंद्र लाक्रा (महाराष्ट्र), के.के. सुनीलकुमार (कर्नाटक), सुनीता जी (ओडिशा), अनिल वेलिकल्लील जॉन (अंदमान निकोबार), संजीव कुमार (देहराडून), राजेशकुमार गुलाटी (पंजाब), आय. शशीलेमला (नागालँड), किरण दिनकर पाटील (महाराष्ट्र), बेंडनगेस्टू (नागालँड), पांडुरंग पखाले (महाराष्ट्र), शेखर नवनाथ रानपुरे (महाराष्ट्र), तर सुजोग दत्ता (दिल्ली) अशा १५ वनाधिकाऱ्यांची वन्यजीव व्यवस्थापनाचे धडे घेण्याबाबत निवड करण्यात आली आहे. तसेच संजय कुंभारे (देहराडून), दीप जगदीप (कर्नाटक), चंद्रशेखर बाला एन. (महाराष्ट्र), मनोज श्रीवास्तव (दिल्ली), अम्रपाली रॉय (ओडिशा) असे पाच अधिकारी परदेश वारीच्या राखीव यादीत आहेत. मलेशिया येथून व्यवस्थापनाचे धडे घेऊन परत आल्यानंतर या वनाधिकाºयांची भारतात २४ ते २८ डिसेंबर दरम्यान ‘फॉरेन ट्रेनिंग’ आणि ‘फॉरेस्टी पर्सनल’ याविषयावर कार्यशाळा घेतली जाणार आहे.

राज्यात वरिष्ठांना डावलून निवड
महाराष्ट्रातून दोन आयएफएस आणि तीन वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची परदेशवारीसाठी निवड झाली आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून मलेशिया येथे वन्यजीव व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी निवड झालेल्यांमध्ये कनिष्ठांचा समावेश असल्याचा आक्षेप घेतला आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण न करणाऱ्या उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची निवड झाली आहे. याबाबत राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार नोंदविली आहे. परदेशात प्रशिक्षणसाठीदेखील वनाधिकारी वशिलेबाजी करतात, असा आक्षेप घेतला आहे. प्रशिक्षण कालावधी आणि सेवा पूर्ण न करणाऱ्या वनाधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.

Web Title: 15 forest officials going to Foreign tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.