अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील २८ कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:53 PM2017-11-02T13:53:23+5:302017-11-02T13:54:45+5:30

अकोला : दलित वस्ती विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी २८ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अकोट, अकोला तालुक्यातील याद्या वगळता इतर याद्यांना समाजकल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

work of 28 crore get nod in akola districts five talukas | अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील २८ कोटींच्या कामांना मंजुरी

अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील २८ कोटींच्या कामांना मंजुरी

Next
ठळक मुद्देअकोला, अकोट वगळता लाभार्थी याद्या मंजूर


अकोला : दलित वस्ती विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी २८ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अकोट, अकोला तालुक्यातील याद्या वगळता इतर याद्यांना समाजकल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सभापती रेखा अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक बुधवारी पार पडली.
आधीच्या नियोजनानुसार दलित वस्तीमध्ये निधी वाटपातील असमानता दूर करीत नव्याने तयार झालेल्या २८ कोटी रुपये वाटपाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये दलित वस्ती विकास योजनेच्या आराखड्यात मंजूर आणि आतापर्यंत त्यासाठी काहीच निधी न दिलेल्या कामांवर हा निधी देण्यात आला. समितीच्या सदस्यांनी त्याला मंजुरी दिली. सोबतच जिल्हा परिषद उपकरातून राबवल्या जाणाºया वैयक्तिक लाभाच्या योजनांतील लाभार्थींच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये विद्युत पंप, होंडा पंप, टिनपत्रे, ताडपत्री, एचडीपीई पाइप, पीव्हीसी पाइप, रोटाव्हेटर, दिव्यांगासाठी पीठगिरणी, तीनचाकी सायकल, झेरॉक्स मशीन लाभार्थींचा समावेश आहे. प्राप्त अर्जांतून १५० पेक्षाही अधिक पात्र लाभार्थींची निवड यादी मंजूर करण्यात आली. बैठकीला सदस्य सरला मेश्राम, देवानंद गणोरकर, बाळकृष्ण बोंद्रे, दीपिका अढाऊ, श्रीकांत खोणे, प्रभारी समाजकल्याण अधिकारी योगेश जवादे उपस्थित होते.
 

अकोला, अकोटचे अर्ज, याद्याच नाहीत
समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थी निवड करण्याच्या बैठकीत प्राप्त अर्जांच्या याद्या सादर करणे आवश्यक होते. त्यापैकी नावांची निवड समितीच्या बैठकीत झाली असती; मात्र अकोला आणि अकोट पंचायत समितीमधून याद्याच आल्या नाहीत. त्यामुळे या दोन तालुक्यांतील लाभार्थी वगळून यादीला मंजुरी देण्यात आली. या प्रकाराने दोन्ही मोठ्या असलेल्या तालुक्यातील लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. या प्रकाराला दोन्ही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांचा हलगर्जीपणा कारणीभूत असून, त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही याद्या मिळाल्या नसल्याची माहिती आहे.

Web Title: work of 28 crore get nod in akola districts five talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.