लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना 'सलाईन'वर; पावसाळ्यातही ४१ गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 02:37 PM2018-07-29T14:37:49+5:302018-07-29T14:39:27+5:30

Water Supply Scheme ;41 villages were thirsty | लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना 'सलाईन'वर; पावसाळ्यातही ४१ गावे तहानलेलीच

लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना 'सलाईन'वर; पावसाळ्यातही ४१ गावे तहानलेलीच

googlenewsNext
ठळक मुद्दे देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील काहीनी पुर्ण देयके भरलेली असून सुद्धा त्यांनाही याचा फटका बसला आहे.

-  संजय उमक
मूर्तिजापूर: तालुक्यातील लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत; परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे.       देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. यामध्ये  मूर्तिजापूर तालुक्यातील २१ गावांचा तर कारंजा तालुक्यातील ३ गावांचा अशा २४ गावांचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी बंद केला आहे. त्याच प्रमाणे देयके स्थगित असल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील १६ आणि कारंजा तालुक्यातील एका गावचा पाणी पुरवठा बंद केला आहे. एकंदरीत ४१ गावांमध्ये जीवन प्राधिकरण विभागानेच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या ५७ गावांपैकी १६ गावांनाच पाणी पुरवठा करण्यात येत असून तोही अनियमित असल्याने सदरची योजना भविष्यात कधीही बंद होऊ शकते.
   सदर्हू योजनेवर असलेले गावांचे थकबाकीचे कारण दाखवून अख्ख्या गावचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला; पंरतु पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील काहीनी पुर्ण देयके भरलेली असून सुद्धा त्यांनाही याचा फटका बसला आहे.
जलकुंभांची स्वच्छता नाही
सध्याच्या स्थितीत या योजने मार्फत १६ गावांना अनियमित गढूळ पाणी पुरवठा होत आहे. प्रत्येक गावातील जलकुंभात (पाण्याची टाकी) प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने व पक्षी मरुन पडल्याने गढूळ व मांसाचे तुकडे असलेला पाणी पुरवठा होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

लाखो रुपये देयका पोटी स्थगित असल्याने १७ गावांचा पाणी पुरवठा तात्पुरता तर २४ कायमस्वरूपी बंद केला आहे. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, पण पाहीजे तसे सहकार्य होत नसल्याने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद करावा लागला.  तात्पुरता पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील लोकांनी देयके भरली तर पाणी पुरवठा पुर्ववत होऊ शकतो.
- एम. आर. बोबडे,
उपविभागीय अभियंता जीवन प्राधिकरण, मूर्तिजापूर

Web Title: Water Supply Scheme ;41 villages were thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.