घराची भिंत कोसळली, चिमुकल्याचा मृत्यू, ५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 01:39 PM2021-07-10T13:39:10+5:302021-07-10T13:39:21+5:30

Wall collapsed ; घराची भिंत कोसळून, चिमुकल्याचा मृत्यू, ५ जण जखमी झाले.

The wall of the house collapsed, boy died, 5 people were injured | घराची भिंत कोसळली, चिमुकल्याचा मृत्यू, ५ जण जखमी

घराची भिंत कोसळली, चिमुकल्याचा मृत्यू, ५ जण जखमी

Next

बाळापूर : राहत्या घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू, तर अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात शनिवारी पहाटे घडली.

बाळापूर शहरात सतरंजीपुरा भागात शेख रसूल शेख वजीर (४२) यांचे विटा मातीचे घर आहे. पावसामुळे मातीच्या  भितींत पाणी मुरल्याने त्या घराची भिंत शनिवारी पहाटे कोसळली. घरा मध्ये झोपलेले शेख रसूल व त्यांची पत्नी शबाना परवीन  व त्यांची मुले शेख रुमान,शेख फरान,शेख इरफान व त्यांचा लहान मुलगा शेख कामरान शेख रसुल ढिगाऱ्याखाली दबले.
घर कोसळल्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला आणि तिच्या मुलांना त्यांनी बाहेर काढले. या घटनेत ९ वर्षीय शेख कामरान शेख रसूल याचा मृत्यू झाला.
 घरातील ५ जण  जखमी झाले.  त्यांना उपचारा साठी ग्रामीण रुग्णालय बाळापूर येते हलवण्यात आले. 

 

 

Web Title: The wall of the house collapsed, boy died, 5 people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.