अकोल्यात उद्या कान-नाक-घसा तज्ज्ञांची विदर्भस्तरीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 08:11 PM2017-11-02T20:11:26+5:302017-11-02T20:11:43+5:30

अकोला : असोसिएशन ऑफ ऑटोरिनोलॉरिगोलॉजिस्ट अर्थात कान-नाक-घसा तज्ज्ञ असोसिएशन विदर्भ प्रदेश व अकोला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ४ व ५ नोव्हेंबर रोजी ‘व्हेंटकॉन २0१७’ ही ३७ वी  विदर्भस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Vidyarthi Parishad of Kan-nose and throat experts in Akola tomorrow | अकोल्यात उद्या कान-नाक-घसा तज्ज्ञांची विदर्भस्तरीय परिषद

अकोल्यात उद्या कान-नाक-घसा तज्ज्ञांची विदर्भस्तरीय परिषद

googlenewsNext
ठळक मुद्दे‘व्हेंटकॉन २0१७’ : आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : असोसिएशन ऑफ ऑटोरिनोलॉरिगोलॉजिस्ट अर्थात कान-नाक-घसा तज्ज्ञ असोसिएशन विदर्भ प्रदेश व अकोला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ४ व ५ नोव्हेंबर रोजी ‘व्हेंटकॉन २0१७’ ही ३७ वी  विदर्भस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असलेल्या या दोन दिवसीय परिषदेत ५0 हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. सतीश जैन, डॉ. अनिल डिक्रूझ व डॉ. के. पी. मोरवाणी आदी डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. परिषदेचे उद्घाटन शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गृहराज्य मंत्री डॉ.  रणजित पाटील, एमएमसी मुंबईचे कार्यकारी सदस्य डॉ. प्रताप जाधव व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोलाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती अकोला शाखेचे अध्यक्ष डॉ. विजय खेर्डे यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेचा प्रारंभ शनिवारी सकाळी  डॉ. सतीश जैन यांच्या व्याख्यानाने होणार आहे. त्यानंतर डॉ. के. पी. मोरवानी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी या सभागृहात डॉ. सतीश जैन यांचे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन होणार आहे. रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहेत. रविवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता नोंदणीने संमेलनास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर डॉ. एस. एल. जयस्वाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. सतीश जैन हे मार्गदर्शन करणार आहेत. दिवसभर तज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन व इतर कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता या दोन दिवसीय परिषदेचा समारोप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 परिषदेला विदर्भातील जवळपास १५0 कान-नाक-घसा तज्ज्ञांची उपस्थिती राहणार आहे. परिषदेच्या यशस्वितेसाठी असोसिएशनच्या विदर्भ रिजनचे अध्यक्ष डॉ. नितीन देवस्थळे, सचिव डॉ. समितर चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. सुनील शेंडे यांच्यासह अकोला आयोजन समितीचे डॉ. किरण लढ्ढा, प्रा. डॉ. अपूर्व पावडे, डॉ. पी. एम. नंदवंशी, डॉ. मधुसुदन सराफ, डॉ. अरुण अग्रवाल, डॉ. ज्योती रेंगी, डॉ. मधुकर गुप्ते, डॉ. स्वाती बाइच्वाल, डॉ. चंद्रशेखर छत्रे, डॉ. स्वाती चिमा, डॉ. भावना पाटील, डॉ. संजीव नरखेडे, डॉ. पराग डोईफोडे, डॉ. सोनल मोदी, डॉ. संदीप धाबेकर, डॉ. राम हेडा आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Vidyarthi Parishad of Kan-nose and throat experts in Akola tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य