चवताळलेल्या नागीणने घेतला एकाचा बळी

By admin | Published: August 18, 2014 01:32 AM2014-08-18T01:32:31+5:302014-08-18T01:45:04+5:30

रविवारी पहाटे अकोला येथील महाकालीनगरमधील थरार

The victim is the victim of one of the herpes zoster | चवताळलेल्या नागीणने घेतला एकाचा बळी

चवताळलेल्या नागीणने घेतला एकाचा बळी

Next

अकोला - मोठय़ा उमरीमधील महाकालीनगरमधील दोरवेकर कुटुंबीय.. रविवारी पहाटे ५ वाजेदरम्यान साखरझोपेत.. याचवेळी त्यांच्या घरामध्ये नाग-नागीणची प्रणयक्रीडा सुरू.. मनोहर दोरवेकर यांचा हात चुकून नाग-नागिणीच्या जोडप्यावर पडला.. त्यामुळे चवताळलेल्या नागीणने मनोहर दोरवेकर यांना चावा घेतला.. अन् काही क्षणातच दोरवेकर कुटुंबातील कर्ता व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेला. या घटनेची चर्चा सुरू असतानाच प्रणयक्रीडेत रंगलेल्या नागाने काही कळण्याच्या आतच नागीणलाही गिळण्यास सुरुवात केली. ते पाहून अनेकांची बोटं तोंडात केली..ही दृष्य मोबाईलमध्ये चित्रित करण्याची हौशीही काहींनी भागवून घेतली.
मोठय़ा उमरीमधील महाकालीनगरमध्ये रहिवासी असलेले दोरवेकर कुटुंबीय रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास साखरझोपेत होते. दोरवेकर कुटुंबीय ज्या खोलीत झोपलेले होते नेमके तेथेच नाग आणि नागीणची प्रणयक्रीडा (लाग) सुरू होती. मनोहर दोरवेकर झोपेतच असतानाच त्यांचा हात चुकून नाग आणि नागीणवर पडला. या प्रकारामुळे प्रणयक्रीडेत व्यत्यय आल्याने चवताळलेल्या नागीणने मनोहर दोरवेकर यांना चावा घेतला. झोपेत असलेल्या दोरवेकर यांना ते जाणवले नाही. काही वेळातच नागीणने पुन्हा त्यांना चावा घेतला. यावेळी दोरवेकर झोपेतून उठताच त्यांना समोर नाग-नागीणची प्रणयक्रीडा सुरू दिसली. त्यांनी हात आणि पाय बघितले तर त्यावर नागीण चावल्याच्या जखमाही त्यांना दिसल्या. या प्रकारामुळे घाबरलेल्या मनोहर दोरवेकर यांनी कुटुंबीयांना जागे केले. कुटुंबीयांनी मनोहर दोरवेकर यांना तातडीने रुगणालयात दाखल केले; मात्र त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तत्पूर्वी, या घटनेची माहिती परिसरात पसरली. काहींनी त्यांच्या घरामध्ये येऊन मदत केली तर काही नागरिकांनी नाग-नागीणची प्रणयक्रीडा पाहण्यासाठी गर्दी केली.
नाग-नागीणची प्रणयक्रीडा सुरू असतानाच नागाने नागीणला गिळण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून आश्‍चर्यचकीत झालेल्या नागरिकांनी हे दृष्य मोबाईलमध्ये टिपले. घटनेचा थरार याची डोळा अनुभवणारे छोटू वाघाळकर यांनी घडलेला प्रकार ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीकडे कथन केला. ते या घटनेच्यावेळी दोरवेकर यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. मनोहर दोरवेकर यांच्या मृत्यूमूळे एकीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत असून, दुसरीकडे नागाने नागीणला गिळल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The victim is the victim of one of the herpes zoster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.