‘वंदे मातरम्’......शहिदांना स्वरश्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 02:24 PM2019-03-19T14:24:47+5:302019-03-19T14:25:00+5:30

अकोला: पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अकोला जिल्हा मुद्रक संघ, अकोला आर्ट सोसायटी, प्रमिलाताई ओक ग्रंथालय व आरोग्य स्वर औषधी सेवा यांच्या वतीने अकोल्यात वंदे मातरम् स्वरश्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता.

 'Vande Mataram' ......tribute to martyers | ‘वंदे मातरम्’......शहिदांना स्वरश्रद्धांजली

‘वंदे मातरम्’......शहिदांना स्वरश्रद्धांजली

googlenewsNext

अकोला: पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अकोला जिल्हा मुद्रक संघ, अकोला आर्ट सोसायटी, प्रमिलाताई ओक ग्रंथालय व आरोग्य स्वर औषधी सेवा यांच्या वतीने अकोल्यात वंदे मातरम् स्वरश्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी विदर्भातील नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रवीण देशमुख यांनी केले. आयोजक प्रदीप गुरुखुद्दे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित श्रोत्यांना शहीद जवानांच्या परिवारासाठी मदतीसाठी पुढे येण्याची साद गुरुखुद्दे यांनी घातली. मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी सभागृहात मदत पेटी ठेवण्यात आली होती.
कार्यक्रमाला पुलवामा येथील हल्लयात शहीद झालेले जवान नितीन राठोड यांचे मामा भिकाजी चव्हाण व संजय राजपूत यांचे भाऊ राजेश राजपूत उपस्थित होेते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच धनादेशाच्या स्वरू पात जमा झालेला मदत निधी दोन्ही परिवाराच्या सदस्यांकडे सपूर्द करण्यात आला. दोन्ही जवानांच्या परिवाराला मदतीचा हात देत अकोल्यातील एका बँकेने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. बँकेचे नाव पुढे न करता २३ मे नंतर मदतीची रक्कम बँकेचे अधिकारी व आयोजक समितीचे पदाधिकारी दोन्ही शहीद सैनिकांच्या घरी जाऊन कुटुंबीयांकडे रक्कम सुपूर्द करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी सर्व कलावंतांनी व आयोजकांनी सैनिकांसारखा पोशाख परिधान केल्यामुळे रसिकांसमोर प्रत्यक्ष सीमेवर लढणारे सैनिकच जणू काही उभे राहून त्यांच्या भावाना व्यक्त करीत असल्याचे जाणवत होते. यामुळे सर्व रसिक श्रोते भावनावश झाले होते. गायक स्मिता डवले, नंदकिशोर दाभाडे, श्याम कपले, नंदकिशोर पाटील, प्रदीप देशमुख, राम भारती, आनंद जहागीरदार, हर्षवर्धन फुलझेले यांनी देशभक्तीपर गीतांचे मधुर स्वरात सादरीकरण करू न शहिदांना स्वरश्रद्धांजली वाहिली. वंदे मातरम्, होठो पे सच्चाई रहती है, मेरे देश की धरती, अब के बरस, जयोस्तुते, देखो वीर जवानो, हिमाला की बुलंदो पे, शूर आम्ही सरदार, चिठ्ठी ना कोई संदेश, है प्रीत जहां की रीत सदा, मेरा रंग दे बसंती चोला, हम हिंदुस्थानी, मेरा कर्मा तु, ऐ मेरे प्यारे वतन, कर चले हम फिदा, संदेसे आते है, ऐ मेरे वतन के लोगो या एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण कलावंतांनी केले.
फोटो आहे

 

Web Title:  'Vande Mataram' ......tribute to martyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.