अज्ञात चोरटयांनी तीन घरे फोडली; हजारोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:04 PM2018-11-18T13:04:30+5:302018-11-18T13:04:43+5:30

अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंतावाडी परिसरातील तीन घरांमध्ये अज्ञात चोरटयांनी धुडघुस घालीत हजारोंचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे उजेडात आली.

Unknown thieves broke three houses; Thousands of ruppes thept | अज्ञात चोरटयांनी तीन घरे फोडली; हजारोंचा ऐवज लंपास

अज्ञात चोरटयांनी तीन घरे फोडली; हजारोंचा ऐवज लंपास

googlenewsNext

अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंतावाडी परिसरातील तीन घरांमध्ये अज्ञात चोरटयांनी धुडघुस घालीत हजारोंचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे उजेडात आली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
सावंतवाडी येथील रहिवासी वी. वी. मेहरे, नाकट गुरुजी आणि जावरकर यांच्या घरातील भाडयाने राहत असलेल्या एका विद्यार्थीनीच्या खोलीतून अज्ञात चोरटयांनी हजारोंचा ऐवज लंपास केला. चोरटयांनी शनिवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान या तीन घरात घुसुन हैदोस घातला, त्यानंतर या तीनही घरातील मुद्देमाल व रोख असा एकून हजारोंचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी पळविला. यामधील नाकट गुरुजी अपार्टमेंटमधील रहिवासी असून त्यांच्याच फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटमध्ये पोलीस कर्मचारीही रहिवासी असल्याची माहिती आहे. तर मेहरे यांचे मोठे घर असून त्यांच्या घरातील साहित्यही अज्ञात चोरटयांनी लंपास केले आहे. या तीनही जनांनी सिव्हील लाईन्स पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून चोरटयांचा शोध सुरु केला आहे.

 

Web Title: Unknown thieves broke three houses; Thousands of ruppes thept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.