मोठी उमरी रस्त्याचे होणार रूंदीकरण; महापौर, आयुक्तांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:12 PM2018-06-23T15:12:43+5:302018-06-23T15:15:50+5:30

अकोला: मोठी उमरी ते गुडधी रोडवरील चाळीस क्वॉर्टरपर्यंत रस्ता रूंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. या रस्त्याची शासकीय मोजणी शिट तयार झाल्यानंतर शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी उमरी परिसरातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

umri road will be widened; mayor, Commissioner viset the site | मोठी उमरी रस्त्याचे होणार रूंदीकरण; महापौर, आयुक्तांनी केली पाहणी

मोठी उमरी रस्त्याचे होणार रूंदीकरण; महापौर, आयुक्तांनी केली पाहणी

Next
ठळक मुद्देमोठी उमरी ते गुडधी परिसरातील चाळीस क्वॉर्टरपर्यंत १ हजार ८०० मीटर मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.रस्त्याचा मध्यभाग (सेंटर)काढून रस्त्यालगतच्या इमारतींना ‘मार्किंग’करण्याचे काम आटोपल्याची माहिती आहे. शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मोठी उमरी परिसरातील मालमत्ताधारकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.


अकोला: मोठी उमरी ते गुडधी रोडवरील चाळीस क्वॉर्टरपर्यंत रस्ता रूंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. या रस्त्याची शासकीय मोजणी शिट तयार झाल्यानंतर शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी उमरी परिसरातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
महापालिका क्षेत्राची हद्दवाढ केल्यानंतर त्यामध्ये शहरालगतच्या २४ गावांचा समावेश करण्यात आला. हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागांच्या विकास कामांसाठी आ.रणधीर सावरकर यांनी १०० कोटींच्या विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळवली. यादरम्यान, मोठी उमरी ते गुडधी परिसरातील चाळीस क्वॉर्टरपर्यंत १ हजार ८०० मीटर मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागणीनुसार भूमि अभिलेख विभागाने मोठी उमरीतील रेल्वे पूल ते चाळीस क्वॉर्टरपर्यंत रस्ता व रस्त्यालगतच्या मालमत्तांची मोजणी शिट तयार केली. त्यानुसार ‘पीडब्ल्यूडी’ व मनपाचा नगररचना विभाग, विद्युत विभाग कामाला लागले आहेत. रस्त्याचा मध्यभाग (सेंटर)काढून रस्त्यालगतच्या इमारतींना ‘मार्किंग’करण्याचे काम आटोपल्याची माहिती आहे. यानंतर रस्ता रूंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या इमारतींचा अतिक्रमीत भाग काढण्याची कारवाई केली जाईल. त्यानुषंगाने शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मोठी उमरी परिसरातील मालमत्ताधारकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच रस्ता रूंदीकरणाचे महत्त्व पटवून दिले. याप्रंसगी भाजप नगरसेवक मिलिंद राऊत, संदीप गावंडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


रेल्वे पूल ते जठारपेठ चौकाकडे येणारा सिमेंट रस्ता अरूंद असल्यामुळे या ठिकाणी दररोज अपघात होतात. प्रशस्त रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळते. त्यामुळेच मोठी उमरीचा रस्ता १८ मीटर रूंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आ.रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी साडेपाच कोटींची तरतूद करण्यात आली असून, गरज भासल्यास वाढीव निधी प्राप्त करता येईल.
-विजय अग्रवाल, महापौर.

 

 

Web Title: umri road will be widened; mayor, Commissioner viset the site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.