अवैध गौण खनिजासह दोन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 09:26 PM2017-10-22T21:26:42+5:302017-10-22T21:35:08+5:30

हिवरखेड : अडगाव-सिरसोलीदरम्यान २२ ऑक्टोबर रोजी  अवैध गौणखनिज चोरून नेत असताना दोन ट्रॅक्टरसह  दोघांजणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी कारवाई केली. 

Two tractors seized with illegal minor minerals | अवैध गौण खनिजासह दोन ट्रॅक्टर जप्त

अवैध गौण खनिजासह दोन ट्रॅक्टर जप्त

Next
ठळक मुद्देदोन जणाविरुद्ध गुन्हा दाखलबोर्डी नदीतून होतेय गौणखनिजाची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : अडगाव-सिरसोलीदरम्यान २२ ऑक्टोबर रोजी  अवैध गौणखनिज चोरून नेत असताना दोन ट्रॅक्टरसह  दोघांजणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी कारवाई केली. 
अडगाव-सिरसोली बोर्डी नदीमधून अवैधरित्या गौणखनिज ट्रॅ क्टर-ट्रॉलीमधून चोरून नेत असल्याची माहिती हिवरखेड  पोलिसांना रविवारी मिळाली. त्यावरून  ठाणेदार विकास देवरे  यांच्या मार्गदर्शनात पांडुरंग राऊत, हवालदार संजय पाटील,  आकाश राठोड, संजय महल्ले यांनी नदीपात्रातून अवैध  गौणखनिज नेत असताना  एमएच ३७ ए ५0८६ व एमएच ३0  डी ३६५ क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह अवैध गौणखनिज  असा चार लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

या  प्रकरणी सरकारतर्फे संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून  पोलिसांनी अ. शफी अ. नबी, ख्वाजाअली इनायतअली रा.  अडगाव या दोघा जणांविरुद्ध भा.दं.वि.च्या ३७९ कलमान्वये  गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हिवरखेड पोलीस पुढील तपास  करीत आहेत. 

 

Web Title: Two tractors seized with illegal minor minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.