two people killed in accident in akola | ट्रक-अॅपेचा भीषण अपघात; दोन प्रवाशांचा मृत्यू 
ट्रक-अॅपेचा भीषण अपघात; दोन प्रवाशांचा मृत्यू 

दिग्रस : भरधाव ट्रकनं अ‍ॅपेला जबर धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोव प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास वडेगाव-पातूर रस्त्यावर हा अपघात झाला. यामध्ये त्रिगुणा रामकृष्ण सुरवाडे (वय-65 वर्षे) आणि वैशाली गजानन सुरडकर (वय-14 वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर प्रमिलाबाई निखाडे गंभीर जखमी झाल्या आहेत. 

भंडारज येथून प्रवासी घेऊन अ‍ॅपे (एमएच ३० एए ६९१) वाडेगावकडे जात होती. दरम्यान, हिंगणा बस स्थानकावर समोरुन येत असलेल्या ट्रकनं (एचआर ५५ एडी ०१४८) अ‍ॅपेला जबर धडक दिली. यामध्ये अ‍ॅपेतील त्रिगुणा सुरवाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वैशाली सुरडकर या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दीड तासांनी पातूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं आहे.
 


Web Title: two people killed in accident in akola
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.