तिहेरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट ; हत्याकांडासाठी आरोपीने सख्ख्या भाच्याचे लग्नही टाळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:10 PM2018-05-12T15:10:32+5:302018-05-12T15:10:32+5:30

या हत्याकांडच्या अनुषंगाने कानोसा घेतला असाता विष्णू इंगळे यांने शांत डोक्याने व बुधवारी दुपारीच त्याने शिवाणी व मनोजची हत्या केल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला.

Triple killings are planned; The accused avoided even a little brother's wedding for the killings | तिहेरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट ; हत्याकांडासाठी आरोपीने सख्ख्या भाच्याचे लग्नही टाळले 

तिहेरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट ; हत्याकांडासाठी आरोपीने सख्ख्या भाच्याचे लग्नही टाळले 

Next
ठळक मुद्देधोतर्डी प्लॉट म्हणून ओळख असलेल्या ३५० लोकवस्तीच्या गावात विष्णू दशरथ इंगळे व त्याचे कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. क्रूर व निर्दयी पित्याने तीन मुलांची केलेली हत्या हे पूर्वनियोजित कटाचाच एक भाग असल्याची चर्चा धोतर्डी गावात आहे. धोतर्डी येथे घरी पोहोचल्यानंतर त्याने शिवाणी व मनोजला या शीतपेयातून विषारी द्रव्य दिले व दोघांनाही घराच्या आतमध्ये टाक ले.

- सचिन राऊत 

अकोला - धोतर्डी येथील एका क्रूर व निर्दयी पित्याने तीन मुलांची केलेली हत्या हे पूर्वनियोजित कटाचाच एक भाग असल्याची चर्चा धोतर्डी गावात आहे. शुक्रवारी ‘लोकमत’ ने गावात भेट देऊन या हत्याकांडच्या अनुषंगाने कानोसा घेतला असाता विष्णू इंगळे यांने शांत डोक्याने व बुधवारी दुपारीच त्याने शिवाणी व मनोजची हत्या केल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला. सर्वात मोठा मुलगा अजयने विरोध केल्यानंतर आरोपीने त्याच्या डोक्यात वरवंटा मारला त्याची हत्या त्याने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास केली असावी असा कसासही ग्रामस्थांच्या चर्चेत आहे.
धोतर्डी गावाला लागूनच असलेल्या धोतर्डी प्लॉट म्हणून ओळख असलेल्या ३५० लोकवस्तीच्या गावात विष्णू दशरथ इंगळे व त्याचे कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. त्याला तीन मुले होती. यामधील अजय हा १० व्या वर्गात नापास झाला, तर दुसऱ्या क्रमांकाची मुलगी शिवाणी इयत्ता नवव्या वर्गात अकोल्यातील सुशीलाबाई देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती. तिसरा मुलगा मनोजही ८ व्या वर्गाची परीक्षा देऊन मोकळा झाला होता. तीनही मुलांचे शिक्षण सुरू असताना वडिलांना आधार म्हणून ते शेतीत निंधनाचे काम करायचे. अशातच त्याच्या पत्नीचा वर्षभरापूर्वी कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर विष्णू इंगळे याच्यावर तीनही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली होती; मात्र मुलांनी वडिलांवर तो भार कधीच येऊ दिला नाही. तीनही मुले वडिलांच्या प्रचंड दबावात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वडिलांनी खायला दिले तर घ्यायचे अन्यथा उपाशी राहून ते दिवस काढायचे. तीनही मुलांना घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती, एवढेच काय तर केवळ दोन ते तीन फूट अंतरावर आजी-आजोबा रहिवासी असताना त्यांच्याकडेही जाण्यास विष्णू इंगळे तीनही मुलांना विरोध करीत होता. विष्णू इंगळेची सख्खी बहीण खडका येथे दिली असून, तिच्या मुलाचे ८ ते ९ मे रोजी लग्न होते. या लग्नासाठी विष्णू इंगळेचे आई-वडील जाण्याची तयारी करीत असताना शिवाणीला सोबत नेणार होते; मात्र विष्णूने मुलीला जाण्यास विरोध केला. हे दोघेही खडका येथे ८ मे रोजी गेल्यानंतर ९ मे रोजी सकाळीच विष्णू हा अकोल्यात गेला होता. त्याने येथूनच मुलांसाठी शीतपेय, दारुची बॉटल खरेदी केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास धोतर्डी येथे घरी पोहोचल्यानंतर त्याने शिवाणी व मनोजला या शीतपेयातून विषारी द्रव्य दिले व दोघांनाही घराच्या आतमध्ये टाक ले.


जोड आहे.

 

Web Title: Triple killings are planned; The accused avoided even a little brother's wedding for the killings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.