चारमोळी येथे फलक जाळल्याप्रकरणी तिघांना अटक; पोलीस बंदोबस्त कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:58 AM2017-12-05T01:58:16+5:302017-12-05T02:01:14+5:30

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चारमोळी येथे शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी महापुरुषांचे फलक जाळल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी तिघांना अटक केली. गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त कायम आहे. 

Three people arrested for burning a lantern at Charouli; Police settlement persists! | चारमोळी येथे फलक जाळल्याप्रकरणी तिघांना अटक; पोलीस बंदोबस्त कायम!

चारमोळी येथे फलक जाळल्याप्रकरणी तिघांना अटक; पोलीस बंदोबस्त कायम!

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी रात्री काही समाजकंटकांनी महापुरुषांचे फलक जाळल्याची घटनागावात तणावपूर्ण शांतता 

लोकमत न्यूज नेटवर्क
आलेगाव (अकोला): चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चारमोळी येथे शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी महापुरुषांचे फलक जाळल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी तिघांना अटक केली. गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त कायम आहे. 
चारमोळी येथे शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक जाळल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती.  त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषद शाळेसमोर मोर्चा नेऊन समाजकंटकांच्या अटकेची मागणी केली होती. जमाव आक्रमक झाल्याने गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य पाहता बाळापूरचे उपविभागीय अधिकारी शेख, बाळापूरचे ठाणेदार अनिल ठाकरे, चान्नीचे प्रभारी ठाणेदार मुकुंद वाघमोडे, पातूरचे ठाणेदार देवराव खंडेराव, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी ग्रामस्थांनी चान्नी पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली  होती. चान्नी पोलिसांनी या घटनेचा तपास करून दिनकर खुळे, सतीश देवकर, सुखदास धोंगळे सर्व राहणार चारमोळी यांना अटक केली.  दरम्यान, पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी यांनी घटनास्थळाला भेट देऊन गावातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अटक केलेल्या आरोपींना चान्नी पोलिसांनी पातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. 

Web Title: Three people arrested for burning a lantern at Charouli; Police settlement persists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.