आठ जिल्ह्यांमध्ये बनणार टेक्सटाइल पार्क

By admin | Published: October 17, 2015 02:00 AM2015-10-17T02:00:44+5:302015-10-17T02:00:44+5:30

अकोला, बुलडाण्याचाही समावेश.

Textile Park will be set up in eight districts | आठ जिल्ह्यांमध्ये बनणार टेक्सटाइल पार्क

आठ जिल्ह्यांमध्ये बनणार टेक्सटाइल पार्क

Next

अकोला: कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये टेक्सटाइल पार्क उभारण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठही जिल्ह्यांमध्ये टेक्सटाइल मेगापार्क उभारण्याचे शासनाच्या सहकार, विपणन व टेक्सटाइल विभागाने ठरविले आहे. त्यात अकोला जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. सहकार, विपणन व टेक्सटाइल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी पुणे येथे १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आठ जिल्ह्यांमध्ये टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. देशातील औद्योगिक क्षेत्रात ह्यमेक इन इंडियाह्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत देशांतर्गत औद्योगिक विकासाला प्रोत्साहन दिले जात असून, त्या अनुषंगाने अनेक प्रकल्प उभे राहणार आहेत. त्याचाच एक भाग हा टेक्सटाइल मेगापार्क आहे. अमरावती शहरात टेक्सटाइल प्रकल्प उभारणीसाठी ५00 हेक्टर जागा यापूर्वीच उपलब्ध करण्यात आली. कॉटन बेल्ट म्हणून पश्‍चिम विदर्भ, खान्देश, मराठवाडा हा भाग ओळखला जातो. या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. एकेकाळी पश्‍चिम विदर्भात सूतगिरण्यांसह अनेक कापड उद्योग होते; परंतु कालांतराने सूतगिरण्या आणि कापड उद्योग बंद पडले. आता कॉटन बेल्ट म्हणून पुन्हा ओळखल्या जाणार्‍या बीड, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि जालना आदी जिल्ह्यांमध्ये टेक्सटाइल पार्क उभारण्याचे शासनाने प्रस्तावित केले आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने राज्यात टेक्सटाइल पार्क उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. टेक्सटाइल पार्क उभारताना पर्यावरण संरक्षणालाही महत्त्व दिले जाणार आहे. टेक्सटाइल पार्क उभारण्यासाठी सबसिडी ह्यमेक इन इंडियाह्ण अंतर्गत राज्यात आठ जिलंमध्ये टेक्सटाइल पार्क उभारण्यासाठी नोव्हेंबर २0१५ पर्यंत जागांची पाहणी व अंदाजपत्रक तयार करण्यात येईल आणि नंतर जागा हस्तांतरणाची प्रक्रिया होईल. टेक्सटाइल पार्कसाठी लागणार्‍या यंत्रसामग्रीसाठी शासनाकडून २0 ते २५ टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. अकोलेकरांना दिलासा अनेक वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात अकोला जिल्हा मागासलेला आहे. अकोल्यात टेक्सटाइल पार्क उभारण्याची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली; परंतु विदर्भात केवळ अमरावती जिलतच टेक्सटाइल पार्क उभारण्याची घोषणा झाली होती. आता अकोला जिलचाही त्यात समावेश झाल्याने येथील कापड उद्योगाला गती मिळेल आणि हजारो बेरोजगार हातांना काम मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

Web Title: Textile Park will be set up in eight districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.