तेल्हारा : तळेगाव पातुर्डा येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:21 AM2018-01-22T02:21:06+5:302018-01-22T02:21:26+5:30

तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून पंचायत समिती सदस्यासह १४ जणांविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Telhara: In Talegaon Paturda, due to road dispute, two groups clash | तेल्हारा : तळेगाव पातुर्डा येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

तेल्हारा : तळेगाव पातुर्डा येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

googlenewsNext
ठळक मुद्देपं. स. सदस्यांसह १४ जणांविरु द्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून पंचायत समिती सदस्यासह १४ जणांविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
तळेगाव पातुर्डा येथील सुभाष हरिभाऊ इंगळे यांनी तेल्हारा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी शेतातून टॅक्टर व टॉली खाली करून परत येत असताना ज्ञानेश्‍वर गजानन गव्हाळे, गोपाल कैलास वसतकार, भगवान भरत वसतकार, किसन कैलास वसतकार यांनी संगनमत करून माझा टॅक्टर अडवला. तसेच हातपाय तोडून टाकण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. या प्रकरणी इंगळे यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी चौघांविरुद्ध कलम ३४१, २९४,५0६,३४ नुसार गुन्हा दाखल केला. दुसर्‍या गटाच्या ज्ञानेश्‍वर गव्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पंचायत समिती सदस्य राजू इंगळे, शुभम इंगळे, विशाल सपकाळ, विशाल इंगळे, रामू पाचपोर, सुभाष इंगळे, दिनकर इंगळे, भगवान इंगळे, अविनाश इंगळे, गजानन इंगळे यांनी सार्वजनिक रस्त्याच्या खोदकामावरून आपल्याबरोबर वाद घातला. तसेच गैरकायदेशीर मंडळी जमवून लोखंडी पाइपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी १0 जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात जमादार अनिल खिल्लारे, गजानन राठोड करीत आहेत.

Web Title: Telhara: In Talegaon Paturda, due to road dispute, two groups clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.