‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड : सातबारा मिळेना ; शेतकऱ्यांची तलाठ्यांकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:22 PM2018-06-06T13:22:26+5:302018-06-06T13:22:26+5:30

अकोला : ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांवर ‘आॅनलाइन ’ सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे.

Technical failure in server: Satbara; Farmer's not get sat bara | ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड : सातबारा मिळेना ; शेतकऱ्यांची तलाठ्यांकडे धाव!

‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड : सातबारा मिळेना ; शेतकऱ्यांची तलाठ्यांकडे धाव!

Next
ठळक मुद्देसर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, आॅनलाइन अद्ययावत सात-बारा शेतकºयांना मिळत नाही. काही ठिकाणी जुना सात-बारा मिळतो; मात्र अद्ययावत सात-बारा उतारा मिळत नाही.तलाठ्यांकडून ‘लॅपटॉप’ द्वारे ‘सात-बारा’ची प्रिंट उपलब्ध करून दिली जात आहे.

- संतोष येलकर

अकोला : ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांवर ‘आॅनलाइन ’ सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यानुषंगाने सात-बारा आॅनलाइन झाला असला तरी,त्यासाठी मात्र शेतकºयांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
खरीप पेरण्यांच्या तयारीची लगबग सुरू असताना कर्जमाफी व पीक कर्जासह इतर कामांसाठी आवश्यक असलेला आॅनलाइन सात-बारा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर शेतकºयांची गर्दी होत आहे; परंतु सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, आॅनलाइन अद्ययावत सात-बारा शेतकºयांना मिळत नाही. काही ठिकाणी जुना सात-बारा मिळतो; मात्र अद्ययावत सात-बारा उतारा मिळत नाही. त्यामुळे सात-बारा मिळविण्यासाठी पूर्वीप्रमाणेच जिल्ह्यातील शेतकºयांना संबंधित तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. तलाठ्यांकडून ‘लॅपटॉप’ द्वारे ‘सात-बारा’ची प्रिंट उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यानुषंगाने सात-बारा आॅनलाइन झाला असला तरी, सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, सेतू केंद्रांवर अद्ययावत सात-बारा मिळत नसल्याच्या स्थितीत, सात-बारा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.

सात-बारा तातडीने मिळत नसल्याने कामे प्रभावित!
खरीप पेरणीच्या तयारीत गुंतलेल्या शेतकºयांना कर्जमाफी, पीक कर्ज व इतर शेतीविषयक कामांसाठी सात-बारा आवश्यक आहे; मात्र सेतू केंद्रांवर आॅनलाइन अद्ययावत सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळविण्याकरिता शेतकºयांना धावाधाव करावी लागत आहे. सात-बारा तातडीने मिळत नसल्याने पीक कर्जासाठी अर्ज सादर करण्यासह शेतकºयांची अनेक कामे प्रभावित झाली आहेत.

सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, शेतकºयांना सेतू केंद्रांवर आॅनलाइन अद्ययावत सात -बारा मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. संंबंधित तलाठ्यांकडून लॅपटॉपद्वारे सात-बाराची प्रिंट शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेतू केंद्रांमार्फत शेतकºयांना आॅनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-संजय खडसे
उपविभागीय अधिकारी, अकोला.

 

Web Title: Technical failure in server: Satbara; Farmer's not get sat bara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.