अकोल्यातील चिमुकल्या तनवीरला हवी किडनी, आई तयार मात्र; शस्त्रक्रीयेसाठी पैशांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:01 PM2018-08-28T12:01:28+5:302018-08-28T12:14:02+5:30

अकोला: येथील वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या ११ वर्षीय मोहम्मद तनवीर या मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून त्याला कीडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. परंतु, प्रत्यारोपन शस्त्रक्रीया व ‘डायलेसीस’साठी लागणारा ८ ते ९ लाख रुपयांचा खर्च त्यांच्या ऐपतीपलीकडचा असल्याने या मुलाच्या भवितव्यासाठी दानदात्यांनी समोर येण्याची गरज आहे.

Tanwir kidney feliur, mother ready to donate but money problem for transplant | अकोल्यातील चिमुकल्या तनवीरला हवी किडनी, आई तयार मात्र; शस्त्रक्रीयेसाठी पैशांची अडचण

अकोल्यातील चिमुकल्या तनवीरला हवी किडनी, आई तयार मात्र; शस्त्रक्रीयेसाठी पैशांची अडचण

Next
ठळक मुद्देदोन्ही कीडनी निकामी झाल्याचे कळल्यावर त्याच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. प्रत्यारोपणासाठी ६ लाख रुपयांचा खर्च असून डायलीसीससाठी आणखी दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. प्रत्यारोपनाच्या खर्चासाठी समाजातील सहृदयी दानदात्यांनी पुढाकार घेतल्यास तनवीरला तातडीने उपचार मिळतील.

- सचिन राऊत
अकोला: येथील वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या ११ वर्षीय मोहम्मद तनवीर या मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून त्याला कीडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. परंतु, प्रत्यारोपन शस्त्रक्रीया व ‘डायलेसीस’साठी लागणारा ८ ते ९ लाख रुपयांचा खर्च त्यांच्या ऐपतीपलीकडचा असल्याने या मुलाच्या भवितव्यासाठी दानदात्यांनी समोर येण्याची गरज आहे.
मो. तनवीर याचे वडील मोलमजुरीचे काम करतात. त्यांचा मुलगा तनवीरच्या दोन्ही कीडनी निकामी झाल्याचे कळल्यावर त्याच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. मात्र तनवीरच्या कुटुंबीयांनी धीर न सोडता, त्याच्यावर उपचार सुरु केले. हातमजुरी करून तनवीरचे ‘डायलीसीस’ करण्यात येत आहेत. आतापर्यंत गोळा केलेली पै-अन-पै त्यांनी तनवीरच्या उपचारासाठी व डायलीसीससाठी खर्च केले. मात्र त्याचे वय केवळ ११ वर्ष असल्याने हे डायलीसीस त्याच्या जिवाला धोकादायक आहे. त्यामुळे तनवीरला किडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. चाचण्या सुरु केल्यानंतर किडनी प्रत्यारोपण होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले, मात्र किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रीयेचा खर्च सांगताच तनवीरच्या कुटुंबीयांवर पुन्हा एकदा संकट कोसळले. प्रत्यारोपणासाठी ६ लाख रुपयांचा खर्च असून डायलीसीससाठी आणखी दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. तनवीरला सोमवारी मुंबईतील जसलोक व जेजे हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आहे. त्याच्या प्रत्येक डायलीसीससाठी तीन हजार रुपयांचा खर्च येत आहे. जिवाला धोका असतांनाही त्याचे कुटुंबीय डायलीसीस करीत आहे. मात्र प्रत्यारोपनाच्या खर्चासाठी समाजातील सहृदयी दानदात्यांनी पुढाकार घेतल्यास तनवीरला तातडीने उपचार मिळतील, आणि त्याच्या आईच्या किडनी प्रत्योरापनानंतर त्याला नवजीवन मिळणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले, मात्र गरज आहे ती आता त्याला समाजाच्या आर्थिक मदतीची.

दानदात्यांनी पुढाकार घेण्याची गरज
मुंबईतील सामाजिक संस्था व शासनाकडून किडनी प्रत्यारोपनासह डायलीसीससाठी तनवीरला मदत मिळणार आहे. मात्र या दोन्ही ठिकाणच्या प्रक्रीया प्रचंड वेळ लागणाऱ्या आहेत. आणि तनवीरची किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रीया तातडीने करणे गरजेचे असल्याने या सामाजिक संस्था व शासनाची मदत त्याला वेळेत मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामूळेच समाजातील दानदात्यांनी तनवीरला आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तनवीरचे कुटुंबीय वाशिम बायपास परिसरातील इन्स्पेक्टर कॉलनीत रहिवासी आहे.

Web Title: Tanwir kidney feliur, mother ready to donate but money problem for transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.