आज आकाशात दिसणार ‘सुपरमून’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 10:29 AM2021-05-26T10:29:55+5:302021-05-26T10:30:12+5:30

Supermoon : दुसरा सुपरमून २६ मेच्या रात्री पौर्णिमेच्या रात्री दिसेल.

'Supermoon' to appear in the sky today! | आज आकाशात दिसणार ‘सुपरमून’!

आज आकाशात दिसणार ‘सुपरमून’!

Next

अकोला : यंदा वर्षभरात तीन सुपरमून दिसणार आहेत. त्यापैकी दुसरा सुपरमून २६ मेच्या रात्री पौर्णिमेच्या रात्री दिसेल. या दिवशी चंद्र साधारणपणे १० टक्के मोठा व ३० टक्के अधिक प्रभावी दिसणार आहे. खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंना हा सुपरमून अवलोकण्याची संधी मिळणार आहे.

पृथ्वी व चंद्रादरम्यानचे अंतर नेहमी ३.८५ लाख किमी एवढे असते. परंतु, २६ मे रोजी हे अंतर ३ लाख ५८ हजार ६१५ किमी एवढे राहणार आहे. त्यामुळे चंद्रबिंब मोठे व प्रकाशमान दिसणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती- ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यांसारख्या घटना घडू शकतात. सुपरमून खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी अवश्य अभ्यासावा. तो साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

Web Title: 'Supermoon' to appear in the sky today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.